वर्ल्ड कप फायनलनंतर सुनील शेट्टीची भावूक पोस्ट, अण्णाला चाहत्यांनीही दिली दाद
Sunil Shetty on World Cup 2023 : सुनील शेट्टी यांनी वर्ल्ड कपच्या अखेरच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे.
Sunil Shetty on World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात असं काही घडलं की ज्याचा विचार कधी कोणी केला नसेल. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियानं बाजी मारत विजेतेपद मिळवले. या मॅचमध्ये अपयशी झाल्यानंतर सगळ्या भारतीय टीमच्या खेळाडू दु:खी झाले. फक्त क्रिकेटपटूच नाही तर त्यांच्यासोबत सगळे नागरिक देखील नाराज झाले. इतकं झाल्यानंतर सगळ्या नागरिकांनी भारतीय क्रिकेट टीमला पाठिंबा दिला. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी आहे. सुनील शेट्टी यांचा जावई केएल राहुल हा देखील वर्ल्ड कपच्या भारतीय क्रिकेट टीममध्ये होता. चला तर जाणून घेऊया काय म्हणाले सुनील शेट्टी.
सगळ्यात आधी सुनील शेट्टी यांनी ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या चांगल्या खेळीची स्तुती केली. त्यांनी यावेळी म्हटलं की, वर्ल्ड कप फायनल जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. माझ्या टीम इंडियासाठी वाईट दिवस होता. त्यामुळे या संपूर्ण सामन्यात टीम इंडियाच्या ताकदीकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यांनी 10 सामने जिंकले आहेत. खरंतर या टीममध्ये उत्तम फलंदाज आणि उत्तम गोलंदाज आहेत आणि ते देखील आउटस्टॅन्डिंग वर्ल्ड क्लास टीम आहेत. जो प्रयत्न त्यांनी केला, त्यांनी जी मेहनत घेतली आणि खिलाडूवृत्ती दाखवली त्यासाठी मला त्यांच्यावर अभिमान आहे. त्यामुळे नेहमीच ताट मानेन चालत रहा.
दरम्यान, केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीनं देखील टीम इंडियाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी लिहिलं की ही टीम सगळ्यात चांगली आहे. टीम इंडिया आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. या आधी अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्या दोघी दुःखी असल्याचे पाहायला मिळत होते.
हेही वाचा : वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी रजनीकांत यांच्या अल्पवयीन नातवाला ट्रॅफिक पोलिसांचा दणका
वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात में शाहरुख खान, रणवीर सिंह, गौरी खान, दीपिका पदुकोण, सुहाना खान आणि आशा भोसले यांच्यापर्यंत अनेक कलाकार दिसले. ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा ही वर्ल्ड कप जिंकला आहे. या फायनल मॅचमध्ये 6 विकेटनं ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला.