मुंबई : आयपीएल 2021 मध्ये  सनरायझर्स हैदराबाद टीमच्या खराब कामगिरीमुळे सनरायझर्सच्या फ्रँचायझीने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकले. त्यामुळे आता संघाची कमान केन विल्यमसनच्या हातात आहे. या निर्णयानंतर सगळीकडे खळबळ उडाली, परंतु त्यापेक्षा वॉर्नर सोबत वाईट घडले ते म्हाणजे राजस्थान विरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थानच मिळाले नाही.


डेव्हिड वॉर्नरवर अन्याय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सीझनमध्ये हैदराबाद संघाला सहा सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकता आला. आणि पाच वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे, हैदराबाद आयपीएलच्या पॅईंट टेबलमध्ये सगळ्यात शेवटी आहे. अशा परिस्थितीत संघाने वॉर्नरसारख्या दिग्गज खेळाडूला कर्णधारपदावरून दूर करण्याचा मोठा निर्णय घेतला.


इतकेच नव्हे तर त्याला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतरही त्याला संघातही स्थान देण्यात आले नाही. हैदराबादमच्या संघात ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज सलामीवीरसाठी स्थान नव्हते. अशा परिस्थितीत त्याचे चाहते खूप संतापले आहेत. परंतु या आधी वॉर्नरने या संघाला चॅम्पियन बनवले होते.


डेव्हिड वॉर्नरला  राज्यस्थानसोबच्या मॅचमध्ये खेळाला न मिळाल्याने तो इतका भावूक झाला की, त्याला त्याचे अश्रू आवरले नाही आणि तो मॅच दरम्यान रडू लागला. खरंच ज्या टीमला विजेतेपद जिंकवून दिले, त्या टीममध्ये खेळायला न मिळणे हे किती वेदनादायी असू शकते  याचा अंदाड तुम्ही या फोटो वरुन लावू शकता.



वॉर्नरमुळे हैदराबादला विजेतेपद


हैदराबाद संघानेही डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात आयपीएलमधील एकमेव विजेतेपद जिंकले. वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादला 2016चे आयपीएल विजेतेपद जिंकवून दिले. त्यावेळी या संघाने अंतिम सामन्यात आरसीबीचा पराभव केला होता. त्यामुळे या विरुद्ध चाहाते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.