दुबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादची कामगिरी काहीशी चांगली झालेली नाही. आतापर्यंत त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला आहे. टीमची परिस्थिती फारशी चांगली नसताना सनरायझर्सला अजून एक मोठा धक्का बसला आहे. टीममधील एक महत्त्वाचा विदेशी खेळाडू मायदेशी परतणार आहे. टीमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजचा फलंदाज शेरफाने रदरफोर्ड मध्येच ही स्पर्धा सोडून मायदेशी परतत आहे. शेरफानेच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यामुळे त्याला ही स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागतेय.


सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर लिहिले, "सनरायझर्स हैदराबाद कुटुंबातील शेरफाने रदरफोर्डचे वडील यांचं निधन झालं आहे. याबाबत आम्ही शोक व्यक्त करतो. या कठीण काळात शेरफाने तिच्या कुटुंबासोबत राहण्यासाठी तो आयपीएल बायो-बबल सोडेल."


डावखुरा फलंदाज रदरफोर्ड आयपीएलमध्ये यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचा भाग होता. नुकत्याच पार पडलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्ससाठी 37.42 च्या सरासरीने 262 धावा केल्या.



गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सकडून आठ गडी राखून पराभव झाला. संपूर्ण संघ निर्धारित 20 ओव्हर्समध्ये केवळ 134 धावा करू शकला. दिल्ली कॅपिटल्सने 18 व्या ओव्हर्समध्ये फक्त 2 विकेट्स गमावत सामना जिंकला. पॉइंट टेबल पाहता हैदराबादने आठ सामन्यांमध्ये फक्त एक विजय नोंदवला आहे. त्यांचे केवळ दोन गुण आहेत. आयपीएलमध्ये हैदराबादची कधीही इतकी वाईट परिस्थिती नव्हती.