आजचा दिवस क्रीडा प्रेमींसाठी सुपरसंडे
भारतातील क्रीडा प्रेमींसाठी आजचा दिवस हा सुपरसंडे ठरणार आहे. कारण, खेळाच्या मैदानात महामुकाबले रंगणार आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघादरम्यान आजपासून तीन मॅचेसच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला डेन्मार्क ओपनच्या फायनलमध्ये भारताचा बॅडमिंटनपटू के. श्रीकांतचा मुकाबला रंगणार आहे.
नवी दिल्ली : भारतातील क्रीडा प्रेमींसाठी आजचा दिवस हा सुपरसंडे ठरणार आहे. कारण, खेळाच्या मैदानात महामुकाबले रंगणार आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघादरम्यान आजपासून तीन मॅचेसच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला डेन्मार्क ओपनच्या फायनलमध्ये भारताचा बॅडमिंटनपटू के. श्रीकांतचा मुकाबला रंगणार आहे.
आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताची लढत रंगत वाढवणार आहे. मलेशियाशी भारताची फायनलमध्ये गाठ पडेल. भारतीय हॉकी संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेत सातव्यांदा फायनलमध्ये धडक मारलीय. क्रिकेटच्य वनडे सीरिज मधील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे.
दरम्यान, हा मुकाबला सुरूही झाला असून, मुंबईच्या वानखेडे मैदानावर होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय़ घेतला आहे. हा सामनाही वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. कारण कर्णधार विराट कोहलीचा आपल्या कारकीर्दीतील हा २०० वा सामना आहे. २००८मध्ये कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणानंतर विराटने १९९ सामने खेळले आहेत. आजचा सामना हा त्याच्यासाठी सामन्यांचे द्विशतक करणारा ठरणार आहे.