नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वीच भारतीय खेळाडू सुरेश रैना आणि अमित मिश्रा यांना जोरदार झटका बसला आहे. काही दिवसांपासून दोघेही टीम इंडियात निवड होण्याची वाट पाहात होते. पण, फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे दोघांची संधी सध्यातरी हुकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिटनेसची समस्या आणि मैदानावरील खेळीचा घसरलेला परफॉर्मन्स यामुळे रैना आणि मिश्राची विकेट सामन्यापूर्वीच गेल्याची माहिती आहे. दरम्यान, तामिळनाडूचा ऑस्ट्रेलिया राऊंडर वॉशिंग्टन सुंदर याच्यासोबतही फिटनेसच्या कारणावरूनच अडचण निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून खेळाडू निवडीसाठी फिटनेसची काही मापदंड तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार खेळाडूंची निवड केली जाते. महत्तवाचे असे की, यामुळे भारताच्या संघाची उर्जाही वाढली असून, भारतीय संघाच्या गेल्या काही वर्षांतील कामगिरीत मोठा गुणात्मक फरक पडला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात खेळत असलेल्या रैना आणि मिश्रा यांच्या फिटनेस टेस्टसाठी निवडसमिती तयार होती. मात्र, नॅशनल क्रिकेट अॅकेडमीच्या कोचिंग स्टाफच्या देखरेखेखाली राऊनही हे दोन्ही खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये नापास झाले आहेत. दोघेही गेल्या चार महिन्यांपासून क्रिकेट अकादमीकडून फिटनेस प्रशिक्षण घेत होते. तरीही टेस्टमध्ये त्यांना आपला फिटनेस दाखवता आला नाही.


संघवापसी झालेले खेळाडू


३८ वर्षीय अशिष नेहराने आश्चर्यकारक कमबॅक केले आहे. नेहराने तब्बल ८ महिन्यांनतर कमबॅक केले आहे. नेहरासोबतच दिनेश कार्तिक,शिखर धवनचेही कमबॅक झाले आहे. तर, अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळू शकले नाही.


टी-२० साठी संभाव्य भारतीय संघ


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल , मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी(विकेटकीपर), हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशीष नेहरा, अक्षर पटेल