Deccan Gladiators vs New York Strikers : टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raia) 2020 क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर रैनाने आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली. आता टी-10 लीगमध्ये (T-10 League) रैना खेळत असून त्याला डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. रैनाने न्यूयॉर्क स्ट्रायकर्ससोबत झालेल्या सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी केलेली पाहायला मिळाली. (Suresh raina explosive batting in abu dhabi t10 league deccan gladiators vs new york strikers latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-10 मध्ये रैनाने केलेल्या फलंदाजीने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रैनाच्या संघाच्या विकेट्स पडल्या होत्या, त्यावेळी रैनाचा संघ 100 धावाही करेल असं वाटत नव्हतं. मात्र रैना आल्यावर त्याने आपला खेळ दाखवला. अवघ्या 19 चेंडूंमध्ये 28 धावा काढल्या. या खेळीमध्ये त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारले. 


2022 च्या आयपीएलमध्ये रैना अनसोल्ड राहिला त्यावर्षी तो समालोचन करताना दिसला. त्यानंतर रैना लीगमध्ये भाग घेऊ लागला. पदार्पणात विशेष कामगिरी करू शकला नाही. कारण पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज अँड्र्यू टायने बाद केलं होतं. 



दरम्यान, सुरेश रैना भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी 18 कसोटी सामन्यांमध्ये 768 धावा, 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5614 धावा आणि 78 टी-20 सामन्यांमध्ये 1605 धावा केल्या आहेत. त्याने 205 आयपीएल सामन्यांमध्ये क्रिकेटही खेळले आहे. रैनाला मिस्टर आयपीएल नावानेही संबोधलं जातं.