सुरेश रैनाला दिली सीएसकेमध्ये मोठी जबाबदारी
आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीमचा टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी असणार आहे. तर उपकर्णधारची देखील निवड केली आहे.
मुंबई : आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीमचा टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी असणार आहे. तर उपकर्णधारची देखील निवड केली आहे.
कर्णधारपदाचा अनुभव
सुरेश रैनाने याचा खुलासा केला आहे. रैना गेल्या 2 वर्षापासून गुजरात लायंस टीमचा भाग होता. तो गुजरात लायंसचा कर्णधार होता. 11 व्या सीजनसाठी फ्रेंचायजीने धोनी आणि जडेजाला रिटेन केलं आहे. धोनी पहिल्या सीजनपासून आठव्या सीजनपर्यंत टीमचा कर्णधार होता. यंदा देखील त्यालाच कर्णधार बनवलं जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे मॅनेजमेंटने पुन्हा एकदा रैनाला धोनीनंतरची जबाबदारी सोपवली आहे.
2 वर्षानंतर आगमन
धोनी जर अनफिट असला तर रैना कर्णधार असेल. याआधी देखील असं झालं आहे. 2 वर्षाच्या बंदीनंतर सीएसके पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. 27 आणि 28 जानेवारीला होणाऱ्या लिलावावर आता सगळ्यांची नजर असणार आहे.
जडेजा ऑलराउंडर
रैनाने म्हटलं की, "एम एस धोनी टीमचा कर्णधार असेल तर मी उपकर्णधार. जडेजा एक ऑलराउंडर म्हणून टीममध्ये असेल. यानंतर आता आमची नजर लिलावावर आहे. आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत. त्यानंतर लिलावाची तयारी करु.'