IPL 2022 : आयपीएल 2022 मेगा लिलावात अनेक आश्चर्यचकित गोष्टी पाहिल्या मिळाल्या. यापैकी एक म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असलेल्या सुरेश रैनाला कोणीच विकत घेतलं नाही. आयपीएलच्या लिलावात तो अनसोल्ड राहिला. ज्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. CSK ने देखील त्याच्यात यंदा कोणताही रस दाखवला नाही. दरम्यान सुरेश रैना देखील भावनिक झाला. (Suresh Rain new inning with RCB)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश रैनाची आयपीएलमधील कामगिरी ही चांगली राहिली आहे.य मागच्या सीजनमध्ये तो काही खास करु शकला नाही. 2 कोटी बेस प्राईज असलेल्या रैनावर यंदा कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे सुरेश रैना पुढे काय करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे. अशी चर्चा आहे की, तो आयपीएलमधील संघ RCB सोबत जोडला जाऊ शकतो. पण तो कोणत्या भूमिकेत असेल हे अजून पुढे आलेलं नाही. 


आरसीबी आणि सुरेश रैना यांच्या सध्या चर्चा सुरु असल्याचं देखील बोललं जात आहे. आयपीएलचं मेगा ऑक्शन संपलं आहे. पण तरी देखील आरसीबी त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे.


सुरेश रैना (Suresh Raina) ने अनेक सामन्यांमध्ये आपल्या शानदार खेळीने सीएसकेला विजय मिळवून दिले आहेत. तो एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. ज्याने सर्वच क्षेत्रात आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे.