मुंबई : आयपीएलच्या 2022 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 600 खेळाडूंवर बोली लागली होती. मात्र यामध्ये मिस्टर आयपीएल म्हणजे सुरेश रैनावर यावेळी कोणत्याही टीमने बोली लावलेली नाही. रैना मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्याने त्याचे चाहते मात्र नाराज झाले होते. पण रैनाच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये रैना सहभागी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस्टर आयपीएल म्हणजेच सुरेश रैनाची आयपीएलच्या 15 व्या सिझनसाठी एन्ट्री होणार असल्याचं निश्चित झालं आहे. यावेळी रैना एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यानुसार रैना आयपीएलमध्ये कमेंट्री करताना दिसणार आहे.


डिजनी+हॉटस्टारचे संजोग गुप्ता यांनी एक वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, "सुरेश रैना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत नसल्याने आम्हाला त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामील करून घ्यायचं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे तो हिंदीमध्ये कमेंट्री करणार आहे. मुंबईची बोली त्याच्या हिंदीतून दिसून येते, म्हणून तो हिंदी शिक्षकाकडून क्लासेस पण घेतोय." 


रवी शास्त्रीही करणार कमबॅक


रवी शास्त्री देखील दीर्घकाळानंतर कमेंट्री बॉक्समध्ये परतणार आहे. रवी शास्त्री हे इंग्रजीत अनुभवी कॉमेंट्रिटर मानले जातात. पण यावेळी तेही हिंदीत कमेंट्री करणार आहेत. शास्त्री यांचा टीम इंडियातील कोचपदाचा कार्यकाळ गेल्या वर्षी झालेल्या T20 वर्ल्डकपनंतर संपला. त्यानंतर शास्त्री पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहेत.