Suryakumar Yadav, IPL 2023:  आयपीएल 2023 मध्ये 42 व्या सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात खेळवला गेला होता. राजस्थानने मुंबई इंडियन्सला 20 ओव्हरमध्ये 212 धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरात मुंबई संघाने 19.3 षटकात 214 धावांचा डोंगर रचला आणि हरलेला सामना खिशात घातला. टीम डेव्हिडच्या वादळासमोर यशस्वी जयस्वालची शतकीय स्फोटक खेळी फिक्की पडल्याचं दिसून आलं. तर मिस्टर 360 म्हणून मानला जाणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील चमकल्याचं पहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानविरुद्ध सूर्याने विस्फोटक खेळी केली. मात्र, मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सुर्या कॅच आऊट झाला. राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्मानं (Sandeep Sharma) सुर्यकुमार यादवचा शानदार झेल घेतला आणि राजस्थानचा (RR) संघ सामन्यात पुन्हा परत आला.  19 मीटर अंतर उलट दिशेने धावत संदीप शर्माने  (Sandeep Sharma Catch) हा कॅच घेतलाय. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतूक होताना दिसतंय. मात्र, या कॅचनंतर  सूर्यकुमार यादव याने जे काही केलं, ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.


आणखी वाचा - MI vs RR: रोहित शर्मा Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!


आऊट झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना सूर्याच्या चेहऱ्यावर नाराज स्पष्ट दिसत होती. त्यावेळी त्याच्या तोंडून अपशब्द  (Suryakumar Yadav Abuse) निघाल्याचं पहायला मिळतंय. सूर्याने रागाच्या भरात शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात येत आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.


पाहा Video



1983 च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव (Kapil Dev) यांनी एक भन्नाट कॅच घेतला होता. संदीप शर्माच्या कॅचनंतर अनेकांना 1983 च्या कॅचच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. 8 सामन्यात 4 विजयासह मुंबई इंडियन्स 7 व्या क्रमांकावर पोहचली आहे. तर राजस्थानच्या संघाची घसरगुंडी झाली आहे. सध्या गुजरात टायटन्स 8 सामन्यातील 6 विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.



दरम्यान, मुंबई विरुद्ध राजस्थान सामनाखास राहिला. हा सामना आयपीएलमधील 1000 वा (IPL 1000th Match) सामना होता. तसेच कॅप्टन रोहित शर्माच्या वाढदिवसादिवशी हा सामना खेळवण्यात आला होता. मात्र, या सामन्यात कॅप्टनचा फ्लॉप शो पहायला मिळालाय.