Suryakumar Yadav : इंडियन क्रिकेट टीमचा (Team India) मिडल ऑर्डर फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या अद्भुत खेळाने फॅन्सना चकीत केलंय. इतकंच नाही तर त्याच्या खेळीने दिग्गज व्यक्तींनाही कमाल त्याच्याबद्दल कमाल वाटते. SKY म्हणजेच सूर्यकुमार यादव 360 डिग्री रन्स करू शकतो. असंच पुन्हा एकदा पहायला मिळालंय. आजच्या सामन्यात सूर्याचा एक शॉट चाहत्यांना फारच भावलाय. त्यामुळे आता त्याला 720° शॉट खेळी लागला असल्याचं म्हटलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादवने त्याच्या अद्भुत खेळीद्वारे रिवर्स स्वीप शॉट खेळला. हा शॉट पाहून केवळ चाहतेच नाही तर कॉमेंटेटर्स पण हैराण झाला होते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.               


सूर्याचा हा शॉट 12 व्या ओव्हरमधला आहे. न्यूझीलंडकडून ब्रेसवेल गोलंदाजी करत होता. या ओव्हरच्या चौथ्या बॉलला सूर्यकुमारने टारगेट केलं. ब्रेसवेलने बॉल थोडा पुढे टाकला. या बॉलवर सूर्याने रिवर्स स्वीप शॉट खेळला आणि बॉल बाऊंड्री पार गेली. हा शॉट पाहून कॉमेंट्रीटर्सपण अचंबित झाले होते.



एबी डी विलियर्सशी होते सूर्याची तुलना


सोशल मीडियावर नेहमी सूर्यकुमार यादवची तुलना दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू एबी डी विलियर्सशी होते. क्रिकेटमध्ये तुफानी खेळी प्रत्येक जण खेळतो. मात्र स्वतः एबीच्या मानण्यानुसार, SKY सर्वात बेस्ट आहे. 


दुसरी वनडे पावसाने रद्द


भारत आणि न्यूझीलंड संघातला दुसरी वनडे अखेर पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली. (Team India) आजच्या दिवसात अवघ्या 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला. नियोजित वेळेनुसार सामना सुरु झाला खरा पण दोन वेळा पावसानं हजेरी लावली आणि मॅचमध्ये अडथळा आणला. अखेर पाऊस थांबण्याची चिन्ह नसल्यानं आणि किमान 20 ओव्हर्सचा खेळही शक्य नसल्यानं शेवटी ही मॅच रद्द करण्यात आली.