Suryakumar Yadav: भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज हेमिल्टनमध्ये दुसरा वनडे (India vs New Zealand 2nd ODI) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) पुन्हा एकदा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्यात आला. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करत एक विकेट गमावत 89 रन्स केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान भारतीय फलंदाजीदरम्यान एक घटना अशी घडली जिथे टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला ओपनर फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) माफी मागावी लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


Suryakumar Yadav ने मागितली शुभमनची माफी


टीम इंडियाच्या डावामध्ये 13 वी ओव्हर लॉकी फर्ग्युसन टाकत होता. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सूर्यकुमारला मोठा शॉट खेळायचा होता. मात्र तो बॉलचा टायमिंग ओळखू शकला नाही. ज्यामुळे बॉल 30 यार्ड सर्कलच्या जवळ मीड विकेटला उभ्या असलेल्या खेळाडूकडे पोहोचला. 



मुख्य म्हणजे न्यूझीलंडचे खेळाडू यावेळी बॉल पकडू शकले नाही. ज्यानंतर नॉन स्ट्रायकर एन्डवर उभा असलेला स्ट्राईक बदलण्याच्या मनस्थितीत होता. मात्र सूर्यकुमारने त्याला पाहिलं नाही आणि रन घेण्यासाठी नकार दिला. या पूर्ण घटनेत, सूर्यकुमारने रन न घेतल्यामुळे शुभमन गिलचा माफी मागितली. हीच घटना कॅमेरात कैद झाली आहे. 


दुसरी वनडे पावसामुळे रद्द


भारत आणि न्यूझीलंड संघातला दुसरा वन डे सामना अखेर पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. (Team India) आजच्या दिवसात अवघ्या 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला. नियोजित वेळेनुसार सामना सुरु झाला खरा पण दोन वेळा पावसानं हजेरी लावली आणि मॅचमध्ये अडथळा आणला. अखेर पाऊस थांबण्याची चिन्ह नसल्यानं आणि किमान 20 ओव्हर्सचा खेळही शक्य नसल्यानं शेवटी ही मॅच रद्द करण्यात आली.


9 वर्षांनंतर मालिका जिंकण्याची संधी  


9 वर्षांनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडने आयोजित केलेल्या वनडे मालिकेत पराभूत करण्याची संधी होती. टीम इंडियाने 2013 मध्ये 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा 3-1 ने पराभव केला होता. आता 30 नोव्हेंबरला होणारी तिसरी वनडे भारताने जिंकली तर मालिका 1-1अशी बरोबरीत संपेल. त्याचबरोबर न्यूझीलंडला मालिका जिंकण्याची संधी आहे.