दुबाई: टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू आहे. न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया पहिली फलंदाजी करत आहे. टीम इंडियाच्या 7 ओव्हर आणि 5 बॉलमध्ये 41 धावा झाल्या आहेत. तर टीम इंडियाचे तीन खेळाडू आऊट झाले आहेत. के एल राहुल, रोहित शर्मा आणि ईशान किशन आऊट झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा तुफान फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो न्यूझीलंड विरुद्धचा सामना खेळू शकत नाही. प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली नाही. त्याऐवजी ईशान किशनला संधी देण्यात आली होती. मात्र तो कॅचआऊट झाल्याने त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. 


विराट कोहलीने नाणेफेक झाल्यानंतर सूर्यकुमारला दुखापत असल्याचं सांगितलं. विराट कोहलीनं दिलेल्या माहितीनुसार सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या दुखापतीमुळे इशान किशनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. सूर्यकुमार यादवला बॅक स्पाझ्ममुळे मैदानात खेळण्यासाठी उतरता येणार नाही. 


डॉक्टरांच्या सल्ल्याने सूर्यकुमार यादव सध्या आराम करत आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव या सामन्यात खेळत नसल्यानं बॅटिंग लाईनमध्ये नुकसान होऊ शकतं असा क्रिकेटप्रेमींचा कयास आहे. अजून सूर्यकुमारला किती दिवस आराम करावा लागू शकतो यासंदर्भात अपडेट देण्यात आलेली नाही. 



टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन


विराट कोहली, ईशान किशन, रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, बुमराह, वरूण चक्रवर्ती, आणि के एल राहुल


न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन


मार्टिन गुप्टिल, डेरिल मिशेल, केन विलियमसन (कर्णधार), जेम्स नीशम, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), मिशेल सेंटनर, ईश सोढी, एडम मिल्ने, ट्रेन्ट बोल्ट आणि टिम साऊदी