पावसात न्यूझीलंडच्या कर्मचाऱ्यांसोबत पीच सुकवायला मैदानात उतरला Suryakumar Yadav; व्हिडीओ व्हायरल!
सामना पुन्हा सुरु होऊन तो भारताने जिंकावा यासाठी टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पूर्ण प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसतोय.
India vs New Zealand 2nd ODI : आज हेमिल्टनमध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. आजचा सामना टीम इंडियासाठी (Team India) करो या मरो अशा परिस्थितीचा होता. मात्र पावसाने आजच्या सामन्यात व्यत्यय आणला आणि सामना अखेर रद्द करावा लागला. हा सामना पुन्हा सुरु होऊन तो भारताने जिंकावा यासाठी टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पूर्ण प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसतोय.
सूर्यकुमार यादव न्यूझीलंडच्या दौऱ्यावर फार चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येतोय. न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये त्याने तुफान फलंदाजी केली. तर आजच्या सामन्यात पाऊस आल्यानंतरही सूर्याने चाहत्यांच्या नजरा स्वतःकडे वळवण्यासाठी एक गोष्ट सोडली नाही.
पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. अशावेळी खेळ पुन्हा सुरु व्हावा यासाठी ग्राऊंड मेस मैदानात निरीक्षण करण्यासाठी आणि पीच सुकवण्यासाठी मेहनत करत होते. अशातच सूर्यकुमार यादवने या स्टाफची मदत केल्याचं दिसून आलं. यावेळी सूर्याने त्यांना मदत करत ग्राऊंडमॅनच्या गाडीत बसून मैदानाची जवळून पाहणी देखील केली. यावेळी सूर्याने फार गंभीरतेने हे काम पाहत होता.
दुसरी वनडे पावसामुळे रद्द
भारत आणि न्यूझीलंड संघातला दुसरा वन डे सामना अखेर पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. (Team India) आजच्या दिवसात अवघ्या 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला. नियोजित वेळेनुसार सामना सुरु झाला खरा पण दोन वेळा पावसानं हजेरी लावली आणि मॅचमध्ये अडथळा आणला. अखेर पाऊस थांबण्याची चिन्ह नसल्यानं आणि किमान 20 ओव्हर्सचा खेळही शक्य नसल्यानं शेवटी ही मॅच रद्द करण्यात आली.
सामना रद्द झाल्याने भारताच्या नावे अनोखा रेकॉर्ड
भारतीय संघाचा आज न्यूझीलंड विरूद्धचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. टीम इंडियाचा प्रत्येक 25 वा एकदिवसीय सामना कोणत्या ना कोणत्या कारणाने रद्द होतो. भारतीय संघाचे 42 सामने त्यानंतर न्यूझीलंड संघ दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 41 सामने रद्द झाले आहेत.
आकडेवारी पाहिली तर भारत 42, न्यूझीलंड 41, श्रीलंका 38, ऑस्ट्रेलिया 34, इंग्लंड वेस्ट इंडिज 30, दक्षिण आफ्रिका 21, पाकिस्तान 20, झिम्बाब्वेचे 12, बांगलादेश 3 आणि अफगाणिस्तानचे 3 सामने रद्द झाले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे श्रीलंकेविरूद्ध सर्वाधिक 11 सामने रद्द करण्यात आले. इतर ऑस्ट्रेलिया 10, न्यूझीलंड 6, पाकिस्तान वेस्ट इंडिज 4, इंग्लंड दक्षिण आफ्रिका 3 आणि बांगलादेशविरूद्ध 1 असे भारताचे एकूण 42 सामने रद्द झाले.