Mumbai Indians vs Delhi Capitals : यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सला चांगली सुरूवात करता आली नाही. कॅप्टन हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात सलग 3 पराभवानंतर आता मुंबई इंडियन्सला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर दोन्ही संघात 20 वा सामना खेळवला जातोय. या सामन्यात मुंबईचा (Mumbai Indians) तारणहार खेळाडू मैदानात उतरल्याने मुंबईच्या पुन्हा प्रज्वलित झाल्या होत्या. होय, मुंबई इंडियन्सचा दादूस सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यंदाच्या सामन्यात खेळत असल्याने पलटणच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, सूर्याने अनेकांचा हिरमोड केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा आणि इशान किशनने दमदार सुरूवात करून दिली. रोहित शर्माने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला अन् 7 ओव्हरमध्ये 80 धावा केल्या. मात्र, अक्षर पटेलच्या एका बॉलवर रोहित शर्मा बाद झाला. रोहित अर्धशतकाला केवळ 1 धाव कमी असताना बाद झाला. त्याने 49 धावा केल्या. त्यात 6 फोर अन् 3 सिक्सचा समावेश आहे. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. मात्र, दुसऱ्याच बॉलवर सूर्याची विकेट गेली. जेक फरझार-मासिगुर्कने एक भन्नाट कॅच घेतला. त्यामुळे आता  मुंबई इंडियन्सच्या अपेक्षांचा 'सुर्या'स्त झालाय, असं म्हटलं जात आहे.



मुंबईच्या टीममध्ये टीम डेव्हिड, जेराल्ड कोट्स, मोहम्मद नबी आणि रोमारिया शेफर्ड हे चार परदेशी खेळाडू आहेत. सूर्यकुमार यादव टीममध्ये परतला आहे. नमन धीरच्या जागी तो संघात आला आहे. त्याचवेळी नबीचा डेवाल्ड ब्रेविस आणि शेफर्डच्या जागी मफाकाचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला.


मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.


दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.