Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने T20 क्रिकेटमधून या पाकिस्तानी खेळाडूची संपवली राजवट, आफ्रिकेविरुद्ध केले दोन विक्रम
Suryakumar Yadav : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना दणदणीत जिंकला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन मोठे विक्रम केले आहेत.
Suryakumar Yadav Half Century: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना दणदणीत जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने तुफानी खेळी केली. तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला आहे. त्याच्यामुळेच टीम इंडिया विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरली. सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन मोठे विक्रम केले आहेत. यासह त्याने शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांना मागे टाकले.
सूर्यकुमार यादवने मोठी कामगिरी
सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तुफानी खेळी केली. त्याने केवळ 33 चेंडूत 50 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. एकेकाळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या विकेट्स गमावल्याने टीम इंडिया अडचणीत आल्याचे दिसत होते, मात्र सूर्यकुमार यादवने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
मोहम्मद रिझवानला टाकले मागे
पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानने 2021 साली T20 क्रिकेटमध्ये 42 षटकार ठोकले होते. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मात्र भारताच्या सूर्यकुमार यादवने आता त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. सूर्याकुमारने 2022 मध्ये आतापर्यंत 45 षटकार मारले आहेत. अशाप्रकारे सूर्यकुमार यादवने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला असून मोहम्मद रिझवान याचा मोठा विक्रम मोडला आहे.
शिखर धवनने विक्रम मोडला
सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये धावत आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पहिला आला आहे. त्याने शिखर धवनला मागे टाकले आहे. सूर्यकुमार यादवने 2022 च्या 21 डावात 732 धावा केल्या आहेत, तर धवनने 2018 मध्ये 689 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाला जिंकून दिले अनेक सामने
सूर्यकुमार यादवने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याने टीम इंडियासाठी 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 340 धावा आणि 32 टी-20 सामन्यांमध्ये 976 धावा केल्या आहेत, ज्यात इंग्लंडविरुद्धच्या धडाकेबाज शतकाचा समावेश आहे. तो चौथ्या क्रमांकावर भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज बनला आहे. कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची क्षमता त्याच्यात आहे.
भारतीय संघाने सहज सामना जिंकला
भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. आफ्रिकन संघाने भारताला जिंकण्यासाठी 107 धावांचे टार्गेट दिले होते, जे टीम इंडियाने सहज गाठले. भारताकडून अर्शदीप सिंहने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने आपल्या एका षटकात तीन बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा कणा मोडला. या सामन्यात दीपक चहरने 2 बळी घेतले. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली, त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.