अबुधाबी : आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सविरुध्द मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा फलंदाज सूर्यकुमार यादव याने म्हटले की, या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल असं त्याला वाटत होतं. सूर्यकुमारने या सामन्यात नाबाद 79 धावांची खेळी करत मुंबईला 193 रनपर्यंत पोहोचवलं. राजस्थानचा या सामन्यात 57 धावांनी पराभव झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार हा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला. सामन्यानंतर सूर्यकुमार म्हणाला की, 'मला वाटते की, संघाने मला दबाव नाही तर अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. त्यांनी मला माझा खेळ खेळायला सांगितला आहे. लॉकडाउनने माझ्या बर्‍यापैकी शॉट्सना मदत केली. सर्वात समाधानकारक संघ जिंकणं असतं. कारण मला माहित होते की, 3 विकेट पडल्या आहेत आणि मला शेवटपर्यंत खेळायचे आहे.'


सुर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून सतत चांगली कामगिरी करत आहे. त्याने यामुळे संघात आपलं स्थानही पक्क केलं आहे. त्याची कामगिरी पाहता त्याला आता भारतीय संघात स्थान मिळेल का अशा चर्चा देखील सुरु आहेत.


आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सूर्यकुमार यादव याला निवड समिती संघात स्थान देईल का हे आता पाहावं लागेल. टीम इंडियाचा माजी ओपनर आणि कमेंटेटर आकाश चोपडा याने देखील सूर्यकुमार यादवला भारतीय T-20 संघात देण्यात यावं अशी मागणी केली आहे. आकाश चोपडाने ट्विट करत हे वक्तव्य केलं आहे.