मुंबई : टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादव संध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने 117 धावांची झूंजार शतकी खेळी करत त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली होती. त्याने दिलेली ही एकाकी झूंज टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकली नाही, मात्र तरीही त्याच्या या फलंदाजीची खुप चर्चा होतेय. मात्र तुम्हाला माहितीय का खऱ्या आयुष्यात सुर्यकुमार यादवला आऊट करणारी ही तरूणी आहे तरी कोण? चला तर जाणून घेऊयात.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादवने देविशा शेट्टी या तरूणीसोबत लग्न केले. पाच वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघांनीही २९ मे २०१६ रोजी लग्न केले होते. आज हे जोडपे आनंदात आपलं वैवाहिक जीवन जगतायत. सूर्यकुमार यादव यांची लव्ह लाईफ खूपच मनोरंजक आहे. पत्नी देविशा शेट्टीच्या या एका कृतीने त्यांला भुरळ घातली होती. 


 


सूर्यकुमार यादव यांची पत्नी देविशा शेट्टीचा जन्म 1993 मध्ये मुंबई, येथे झाला. ती एक दक्षिण भारतीय मुलगी आहे. 2013 ते 2015 पर्यंत त्यांनी 'द लाइटहाउस प्रोजेक्ट' या एनजीओसाठी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. सामाजिक कार्यातही ती सक्रिय आहे.


देविशा शेट्टीला कॉलेज जीवनापासूनच नृत्याची खूप आवड आहे. त्यांनी मुंबईत डान्स कोच म्हणून करिअरची सुरुवात केली होती. तिला स्वयंपाक करायलाही आवडतो. 



सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांनी एकाच महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते. जिथे दोघे पहिल्यांदाच भेटले होते. कॉलेजच्या एका कार्यक्रमात देविशाचा डान्स पाहून सूर्या तिच्या प्रेमात पडला होता.त्याचबरोबर देविशाला सूर्यकुमार यादवची फलंदाजीही खूप आवडते.


दरम्यान सूर्यकुमार आणि देविशाने पाच वर्ष एकमेकांना डेट केल. यानंतर 2016 या वर्षी 29 मे ला दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज ते आनंदात आपलं वैवाहिक जीवन जगतायत.  पत्नी देविशा शेट्टी सूर्यकुमार खुप सपोर्ट करताना दिसते. आयपीएलदरम्यान स्टेडियममध्ये सूर्यकुमार यादवला चिअर करताना दिसली होती.