मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20 सामना नुकताच पार पडला आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत-इंग्लंड संघानं 2-2ने बरोबरी केली आहे. चौथ्य़ा सामन्या दरम्यान भारतीय संघाविरोधात दोन चुकीचे निर्णय घेण्यात आले. असं असलं तरी देखील भारतीय संघानं विजयाला खेचून आणलं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण थर्ड अंपायच्या चुकीच्या निर्णयाचा बळी सूर्यकुमार पडल्याचा अनेकांचा दावा आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि फोटो व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण
सूर्यकुमार यावदच्या 50 धावा झाल्यानंतर जेव्हा खेळत होता तेव्हा थर्ड अंपायरच्या चुकीच्या निर्णयाला तो बळी पडला. सॅम कुरेनच्या बॉलवर सूर्यकुमारनं फलंदाजी केली. त्यावेळी डेव्हिड मलाननं ही कॅच पकडली. मात्र हा कॅच सुटला चेंडू खाली पडला आणि त्यानं तो पुन्हा झेलल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. रिप्ले केल्यानंतर बॉल जमिनीवर घासल्याचं दिसत आहे. 





असं असून देखील थर्ड अंपायरनं पहिल्या अंपायरच्या निर्णयाला पाठिंबा दिला. 19.4 ओव्हरदरम्यान भारतीय फलंदाज वॉशिंग्टन सुंदरने जोफ्रा आर्चरच्या बॉलवर फलंदाजी केली तेव्हा फील्डर आदिल रशीदने कॅच पकडत आऊट केलं. रिप्ले केल्यानंतर रशीद बॉल पकडत असताना बाऊंड्रीवर असलेल्या दोरीला पाय लागल्याचंही दिसलं. त्यावरही थर्ड अंपायरनं सुंदरला आऊट असा निर्णय दिला.


या आंतरराष्ट्रीय चौथ्या टी 20 सामन्यादरम्यान थर्ड अंपायर वीरेंद्र शर्माच्या दोन चुकीच्या निर्णयांवर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. थर्ड अंपायरनं दिलेल्या निर्णयावर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.