Suryakumar Yadav चा डिविलियर्स शॉट, आक्रमक खेळी पाहून प्रेक्षक ही हैराण
सुर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपल्या खेळीने भारतीयांचं मन जिंकलं आहे. त्याची आक्रमक खेळी भारतासाठी पुढील काळात फायदेशीर ठरणार आहे.
IND vs WI : सूर्यकुमार यादवने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणार्या तिसर्या T20 सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात आक्रमक खेळीचा अवलंब करणाऱ्या या फलंदाजाने 31 चेंडूत 65 धावांची जलद खेळी केली. दरम्यान, त्याने असे काही शॉट्स खेळले आहेत, जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ( Suryakumar Yadav play deVilliers shot )
सूर्यकुमार यादवचे 7 अप्रतिम षटकार (Suryakumar 7 sixes)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचे चार फलंदाज अवघ्या 93 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतले. दरम्यान, मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीने प्रत्येक भारतीय समर्थकाचे मन जिंकले आहे. सूर्याने आपल्या डावात 7 गगन चुंबी षटकार ठोकले.
टीम इंडियाच्या डावाच्या 15व्या षटकात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज डॉमिनिक ड्रेक्स गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राइकवर आलेल्या सूर्यकुमार यादवने गुडघ्यावर बसून फाइन लेगवर 75 मीटर लांब षटकार मारला. हा षटकार पाहून मैदानात उपस्थित सर्व प्रेक्षकांसह भारतीय खेळाडूंनी टाळ्या वाजवल्या.
सूर्यकुमार-व्यंकटेश अय्यर मध्ये 91 धावांची भागीदारी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 65 धावा केल्या. सूर्याशिवाय डावखुरा फलंदाज व्यंकटेश अय्यरनेही अप्रतिम खेळी केली आहे. या दोन फलंदाजांमध्ये पाचव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी झाली. व्यंकटेश अय्यरने 19 चेंडूत 35 धावा केल्या. ज्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.