जी चूक सर्वांनी केली ती सूर्याच्या वडिलांनी हेरली, सात शब्दात पोराला दिला `हा` सल्ला!
सूर्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्यानंतर वडिलांकडून मोलाचा सल्ला!
Suryakumar Fathers Advice to Him : भारतीय क्रिकेटमध्ये सूर्याकुमार यादव (Suryakumar Yadav) या खेळाडूने आपल्या बॅटींगने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. सूर्याने यंदा नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये परिपक्व झालेल्या सूर्याने आयपीएलमध्ये धमाकेदार खेळी करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. टीम इंडियामध्ये निवड झाल्यावरही सूर्याचं प्रदर्शन कमालीचं राहिलं. आगामी श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्ये त्याच्यावर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सूर्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला मोजक्या शब्दात मोलाचा सल्ला दिला आहे. (suryakumar yadav reveals his fathers seven word advice after becoming india t20 vice captain latest marathi sport news)
आपण पाहिलं असेल की खेळाडूवर संघाचं कर्णधारपद आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी आल्यावर ते दडपण घेताना दिसले. सर्वात ताजं उदाहरण म्हणजे के. एल. राहुल. त्याच्याकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी गेल्यावर त्याच्या बॅटींगवर परिणाम झालेला दिसला. जो के. एल. राहुल आयपीएलमध्ये गोलंदाजांना फोडताना दिसत होता तोच धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे.
रोहित शर्माकडेही संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी गेल्यापासून त्याने मोठी खेळी केली नाही. त्यासोबतच भारतीय संघाच्या कर्णधारपदी अनेक बदल करण्यात आले मात्र कर्णधार किंवा उपकर्णधारपदाची जबाबदारी आल्यावर त्यांच्या प्रदर्शनावर परिणाम झाल्याचं दिसून आलं.
सूर्याच्या वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आल्याचं दिसत आहे. कारण सूर्याची उपकर्णधारपदी निवड होताच त्यांनी एक मोलाचा सल्ला सूर्याला दिला. याबाबत सूर्यानेच माहिती दिली असून, कसलाच दबाव घेऊ नकोस, बॅटींगचा आनंद घे, या सात शब्दात सूर्याच्या वडिलांनी त्याला सल्ला दिला आहे. सूर्याला उपकर्णधारपद कसं मिळालं याबाबत त्यानेच माहिती दिली.
मला माझ्या वडिलांनी याबद्दल सांगितलं, ते सोशल मीडियावर सक्रीय असतात त्यांनीच मला यादी पाठवली आणि एक मेसेजही दिला. कसलाच दबाव घेऊ नकोस, बॅटींगच आनंद घे. मी काहीवेळ डोळे बंद केले आणि मलाच प्रश्न विचारला हे काही स्पप्न तर नाही? पण खरच खूप छान वाटत असल्याचं सूर्यकुमारने म्हटलं आहे.