Suryakumar Yadav return to Ranji Trophy : टी-20 फॉर्मेटमध्ये तुफान खेळ दाखवणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळतोय. मंळवारी मुंबई आणि हैदराबाद (Mumbai vs Hyderabad) यांच्यामध्ये सध्या रणजीचा सुरु झाला. या सामन्यात देखील सूर्यकुमार यादवने त्याच्या तुफान फलंदाजीचा नजराणा दाखवला. जवळपास 3 वर्षांनंतर सुर्यकुमारने रेड बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक केलं, आणि धडाकेबाद फलंदाजी सर्वाचं मन जिंकलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

32 वर्षांच्या सूर्यकुमारने 80 बॉलमध्ये 90 रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने 15 फोर आणि 1 सिक्स देखील लगावला आहे. सूर्याने जवळपास 113 च्या स्ट्राईक रेटने रन केलेत. मात्र यावेळी तो शतक पूर्ण करू शकला नाही. 90 रन्सवर तो LBW आऊट झाला. त्यामुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. 


रणजी ट्रॉफीमध्येही सूर्याचा जलवा कायम


रणजी ट्रॉफीच्या सामन्यात सूर्यकुमारने आक्रामक फलंदाजी केलीये. त्याने त्याच्या खेळीमध्ये केवळी 45 डॉट्स बॉल खेळले. यावेळी त्याने अधितकर रन्स फोर्सच्या माध्यमातून केले आहेत.


यंदाच्या वर्षी सुर्यकुमारची बॅट तळपली


टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सुर्यकुमार यादवसाठी (Surya Kumar Yadav) 2022 हे वर्ष खुप चांगले गेले आहे. या वर्षात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे.त्याने या वर्षात बॅटीने अनेक मोठे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्याचे हे आकडे पाहुन अनेकांचे डोळे विस्फारलेत. दरम्यान या वर्षात त्याने नेमके कोणते एका पेक्षा एक मोठे रेकॉर्ड केले आहेत, हे जाणून घेऊयात. 


टी20 हजार धावा


सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) 2022 या वर्षात 31 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादवची सरासरी 46.56 आहे, तर स्ट्राइक रेट 187.43 आहे. याशिवाय सूर्यकुमारने (Surya Kumar Yadav Records) यावर्षी 2 शतकांव्यतिरिक्त 9 वेळा हाफ सेंच्यूरी केली आहे. दरम्यान एका वर्षात टी-20 फॉरमॅटमध्ये 1000 धावा करणारा सूर्यकुमार भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरलाय.