Suryakumar Yadav : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव सध्या T20 World Cup 2022 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. टी-20 वर्ल्डकपचं ऑस्ट्रेलियामध्ये आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेटर ऑस्ट्रेलियात आहेत. भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत पत्नीसोबत फिरण्यासाठी बाहेर पडला होता. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्या आणि देविशा यांची पहिली भेट 2012 मध्ये मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयात झाली होती. तेव्हा सूर्यकुमार हा बीकॉम पहिल्या वर्षासा तर देविका 12 वीला होती. सूर्याला देविशाचा डान्स खूप आवडयचा. त्यानंतर ते पुढे एकमेकांच्या प्रेमात पडले. एकमेकांना 5 वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी 2016 मध्ये विवाह केला.



सूर्यकुमार यादवने पत्नी देविशा सोबत ऑस्ट्रेलियामध्ये काही ठिकाणी स्पॉट झाला. मेलबर्न, सिडनी आणि पर्थ नंतर ते एडिलेडमध्ये फिरताना दिसले. दोघांनी आपले हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कांगारू सोबतचे काही फोटो देखील त्यांनी शेअर केल्या आहेत.



                   
सूर्यकुमार यादवने देविशा सोबतचा एक फोटो शेअर करत त्यावर लव्ह यू अशी कमेंट लिहिली आहे. सूर्या आणि देविशा ऑस्ट्रेलियामध्ये शॉपिंग करत असताना देखील दिसत आहेत.



                    
सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कपमध्ये लागोपाठ दोन वेळा अर्धशतक ठोकलं. नेदरलँड विरुद्ध 51 तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 40 बॉलमध्ये 68 रनची शानदार खेळी केली. बांग्लादेश विरुद्ध तो 16 बॉलमध्ये 30 रनच करु शकला.



सूर्यकुमार यादवने आपल्या चांगल्या खेळीच्या जोरावर ICC टी20 रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. तो जगातील अव्वल स्थानाचा खेळाडू बनला आहे. सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान याला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे.