Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेट टीम विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 4 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. फेब्रुवारी- मार्च या दरम्यान ही सिरीज खेळवली जाणार आहे. ज्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी म्हणून देखील ओळखलं जातंय 2023 मध्ये ही स्पर्धा टीम भारतात आयोजित करण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नागपूर पहिली टेस्ट खेळवली जाणार आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने शुक्रवारी रात्री उशीरा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 2 टेस्टसाठी 17 सदस्यांची टीम घोषित करण्यात आली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा T20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चं देखील सिलेक्शन करण्यात आलं आहे. मात्र यावर आता चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


सोशल मीडियावर Suryakumar Yadav बाबत चर्चा


भारतीय क्रिकेट टीमचा फलंदाज सूर्यकुमार यादव व्हाईट बॉलमध्ये चांगला खेळ करतोय. नुकतंच त्याने श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये तिसरं शतक ठोकलं. मात्र चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, सूर्याला भारताच्या टेस्ट टीममध्ये समाविष्ट करायला नको होतं.


चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे, सरफराज खान सूर्यापेक्षा जास्त प्रतिभावान खेळाडू आहे. सध्या सरफराज रणजी ट्रॉफीमध्ये उत्तम खेळ करतोय. त्यामुळे टेस्ट सामन्यात सूर्याऐवजी सरफराजला संधी द्यावी, असं चाहत्याचं म्हणणं आहे.







सूर्यकुमार यादवचा टेस्ट (Suryakumar yadav test team) टीममध्ये समावेश


बीसीसीआयने शुक्रवारी रात्री ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 2 टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करणार असून केएल राहुलला उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मुख्य म्हणजे याशिवाय सूर्यकुमार यादवचा टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सूर्या टेस्ट कधी खेळणार असा प्रश्न चाहत्यांकडून खेळवला जाणार आहे. 


ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 2 टेस्टसाठी कशी असेल टीम इंडियाची स्क्वॉड


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्धणार), शुभमन गिल, सी पुजारा, व्ही कोहली, एस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव