Surykumar yadav : सध्या इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) सगळीकडे चर्चा सुरु आहे. श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्याने धुमाकूळ घालत 112 रन्सची खेळी केली. क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू देखील त्याच्या खेळीच कौतुक करतायत. या सर्वांत मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंना सूर्याला रोखायचं कसं हा प्रश्न पडलाय? दरम्यान यावरूनच आता एक मीम व्हायरल झालंय. 


सूर्याच्या नावाने लागला बॅनर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक ट्विट करण्यात आलंय. यामध्ये एका बॅनरवर दूध मागोंगे दूध देंगे, तर दुसऱ्या बॅनरवर खीर मांगोंगे खीर देंगे आणि अजून तिसऱ्या बॅनरवर कही भी बॉल फेको, मार देंगे, असं लिहीण्यात आलंय. मैदानावर सूर्यकुमार कसाही बॉल टाकला तरी त्याला हवेत उडवतो. याचमुळे हे मीम तयार करण्यात आलं आहे. 



विरोधी टीमच्या कर्णधाराला मोठा प्रश्न


मैदानावर सिक्स आणि फोरची आतिषबाजी करणाऱ्या सुर्यकुमार यादवसाठी  (surykumar yadav)नेमकी फिल्डींग लावायची कशी अशा प्रश्न श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाला (Dasun Shanaka) पडला होता. कारण पुढे प्लेयर लावला की मागे मारतो आणि मागे लावला की पुढे मारतो. त्यामुळे सुर्यासाठी  (surykumar yadav) नेमकी फिल्डींग लावायची तरी कशी? असा मोठा प्रश्न आता प्रत्येक प्रतिस्पर्धी खेळाडूंना पडला आहे. 


सूर्याचे वादळी शतक


टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये बॅट पुन्हा एकदा तळपली. सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 रन्स ठोकले होते. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या त्याच्या खेळीच क्रिकेट वर्तुळात कौतुक होतंय. 


जयंत पाटील यांनीही केलं होतं असं ट्विट


नुकतंच अशा आशयाचं एक ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. या ट्विटच्या माध्यमातून पाटील यांनी शिंदे सरकारवर खोचक टीका केली होती. यावेळी ट्विटमध्ये एका बॅनरवर दूध मागोंगे दूध देंगे, तर दुसऱ्या बॅनरवर खीर मांगोंगे खीर देंगे आणि अजून तिसऱ्या बॅनरवर इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी, गुजरात को देंगे, असं म्हटलं होतं.