मुंबई : शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सवर (Gujrat Titans)  5 रन्सने थरारक विजय मिळवला. मुंबईने गुजरातला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार कमबॅक करत सामना जिंकवला. मात्र या सामन्यातील एका घटनेची सगळीकडे प्रचंड चर्चा होताना दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव टायटन्सविरुद्ध खास खेळ करू शकला नाही. मात्र सुर्यकुमार यादवचं एक कृत्य सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होतं. कालच्या सामन्यात सुर्यकुमार यादव फलंदाजी करताना मैदानावर पांढऱ्या रंगाची गोळी घेताना दिसला.


ही गोळी घेतल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा होऊ लागली. यावेळी एका युझरने सुर्यकुमार यादवने Viagra ची गोळी घेतली असल्याचं पोस्ट केलंय. दरम्यान ही गोळी कसली होती, हे समोर आलं नाही. 



मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव फलंदाजी करत होता. यावेळी 11 व्या ओव्हरची सुरुवात होण्यापूर्वी पांढरी गोळी घेतली. मात्र, 11 चेंडूत 13 रन्स करून रशीद खानने त्याला पव्हेलियनमध्ये पाठवलं. 


दरम्यान कालच्या सामन्यात गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी अवघ्या 9 रन्सची गरज होती. मात्र डॅनियल सॅम्सने चिवटपणे गोलंदाजी करत फक्त 3 रन्स दिले. यासह मुंबईला गुजरातला 20 ओव्हरमध्ये 172 धावांवर रोखण्यात यश आलं. मुंबईचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला.