Suryakumar yadav : शुक्रवारचा दिवस हा मुंबईच्या ( Mumbai Indians ) चाहत्यांसाठी अत्यंत वाईट दिवस ठरला. सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्या चाहत्यांच्या आशेवर गुजरात टायटन्सच्या ( Gujarat Titans ) टीमने पाणी फेरलं. मुंबई ( Mumbai Indians ) आणि गुजरात ( Gujarat Titans ) या दोन्ही टीम्समध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसरी क्वालिफायर खेळवण्यात आली. या सामन्यामध्ये गुजरातने मुंबईचा 62 रन्सने पराभव केला. यावेळी सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar yadav ) विकेटचा व्हिडीओ मात्र प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातविरूद्धच्या ( Gujarat Titans ) सामन्यात मुंबईने फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये बदल केले होते. फिल्डींग दरम्यान इशान किशन ( Ishan Kishan ) दुखापतग्रस्त झाल्यामुळे ओपनिंगला त्याच्या जागी नेहल वढेरा आला होता. मात्र रोहित ( Rohit Sharma ) आणि वढेरा या दोघांनाही चांगली कामगिरी करत आली नाही. यानंतर मिस्टर 360 डिग्री म्हणजेच सूर्यकुमार यादवकडून ( Suryakumar yadav ) मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात असताना आवडत्या शॉटच्या नादात त्याने विकेट गमावली. 


सूर्याचे डोळे पाणावले


गुजरातविरूद्धच्या ( Gujarat Titans ) सामन्यात सूर्याचा ( Suryakumar yadav ) सुपला शॉट चुकला. यामुळे 61 रन्सच्या स्कोरवर सूर्याला ( Suryakumar yadav ) माघारी परतावं लागलं. दरम्यान यावेळी विकेट गमावल्यानंतर सूर्याचे डोळे पाणावलेले दिसले. तर सूर्याच्या या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 



ज्यावेळी सूर्यकुमार ( Suryakumar yadav ) फलंदाजी करत होता, त्यावेळी मुंबईचा विजय होईल, अशी चिन्ह दिसत होती. सूर्यकुमार या सामन्यात तुफान फलंदाजी करत होता. चाहत्यांनाही त्याच्याकडून विजयाची अपेक्षा होती, मात्र सूर्या ( Suryakumar yadav ) त्याचा फेव्हरेट सुपला शॉट खेळण्याच्या नादात बोल्ड आऊट झाला. दरम्यान आपण आऊट झालोय याच्यावर सूर्याचा बराच वेळ विश्वासंही बसत नव्हता. विकेट गमावल्यानंतरही बराच वेळी सूर्या क्रिझवर हताश उभा होता. 


सूर्याच्या विकेटचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


मोहित शर्माच्या ( Mohit sharma ) गोलंदाजीवर सूर्याने आपली विकेट गमावली. दरम्यान सूर्याची परिस्थिती पाहून मोहित शर्मानेही त्याची पाठ थोपटली. सूर्याची ( Suryakumar yadav ) विकेट गमावल्यानंतर गुजरात टायटन्सचा विजय जवळपास निश्चित झाला होता. अखेर 62 रन्सने गुजरातने मुंबईवर ( Mumbai Indians ) विजय मिळवला.