IND vs NZ : Suryakumar Yadav टेस्ट खेळण्याची संधी केव्हा मिळणार? खेळाडूने स्वतः दिलं उत्तर
आता सूर्यकुमार टेस्ट (Test format)फॉर्मेटमध्येही खेळणार का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय.
IND vs NZ : वर्ल्डकपनंतर (T20 World cup) आता सूर्यकुमार यादवने (Surykumar yadav) न्यूझीलंडविरूद्धही (IND vs NZ) त्याचा फॉर्म कायम ठेवला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारने तुफान फलंदाजी करत किवी गोलंदाजांना अक्षरशः रडवलं. सूर्याने 51 बॉल्समध्ये 111 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडवर 65 रन्सने विजय मिळवला. यानंतर आता सूर्यकुमार टेस्ट (Test format)फॉर्मेटमध्येही खेळणार का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय.
आतापर्यंत सूर्यकुमारने टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. मात्र अजून त्याला टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला टेस्ट फॉर्मेट खेळण्याची संधी मिळणार का हा प्रश्न चाहत्यांना आहे. दरम्यान यावर आता सूर्यकुमारने स्वतः विधान केलं आहे.
मला लवकरच टेस्ट कॅप मिळणार- सूर्या
न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सूर्यकुमार यादव म्हणाला, जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा केवळ लाल बॉलचा खेळ होता आणि मुंबईकडून मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मी टेस्ट फॉर्मेट चांगल्या पद्धतीने जाणतो. मला आशा आहे की, मला लवकरच टेस्ट कॅप मिळणार आहे.
सूर्यकुमारचा फर्स्ट क्लासचा रेकॉर्डही फार चांगला आहे. सूर्यकुमारने मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये 44.01 च्या सरासरीने 5326 रन्स केले आहेत.
सुर्यकुमारची आतिषबाजी
टी20 वर्ल्ड कपनंतरही सुर्यकुमार यादवची (Surykumar yadav) बॅट थांबलीच नाही, ती धावांसाठी तळपतच आहेत. याची प्रचिती न्युझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात देखील आली. सुर्यकुमारने 49 बॉलमध्ये 111 धावांची नाबाद शतकी तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 7 षटकार ठोकले आहेत. सुर्याच्या या तुफान खेळीच विराट कोहली (Virat Kohli) सह अनेक दिग्गज क्रिकेटपंटून कौतूक केले.
विराटचा 'हा' विक्रम मोडला
टीम इंडियाने दुसरा टी20 सामना जिंकताच सुर्यकुमार यादवला (Surykumar yadav) प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार (man of the match) देण्यात आला. हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्विकारताच त्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याचा कोहलीचा विक्रम मोडला. विराटने आतापर्यंतच्या सहा वेळा हा पराक्रम केला आहे. तर एका कॅलेंडर वर्षात सूर्यकुमार यादवचा हा सातवा सामनावीर ठरला आहे.