T20I Captain : `कधी विचारही केला नव्हता...`, सूर्यकुमार कॅप्टन झाल्यानंतर पत्नी देविशाची पोस्ट व्हायरल
Suryakumar yadav Wife : चार वर्षाच्या कारकीर्दीतच सूर्यकुमार यादवने कॅप्टन्सी मिळवली. अशातच आता पत्नी देविशा शेट्टीने (Devisha Shetty Post) भावूक पोस्ट केलीये.
Devisha Shetty on Captain Suryakumar Yadav : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी टी-ट्वेंटी संघाची (India T20I Squad for Sri Lanka tour) घोषणा केली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला कॅप्टन्सी देण्यात आली. त्यामुळे सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी असेल, हे आता स्पष्ट झालं आहे. अशातच आता 33 वर्षांच्या सूर्याला त्याच्या 4 वर्षाच्या मेहनतीचं फळ मिळालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता सूर्यकुमार यादवच्या पत्नीची (Devisha Shetty) पोस्ट व्हायरल झाली आहे. सूर्यकुमार यादव कॅप्टन झाल्यावर पत्नीने (Suryakumar yadav Wife) इन्टाग्रामवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाली सूर्याची पत्नी?
जेव्हा तू भारतासाठी खेळायला सुरुवात केलीस, तेव्हा असा दिवस पहायला मिळेल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. पण देव महान आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ वेळेवर मिळतं. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझा मला नक्कीच अभिमान आहे. पण ही फक्त तुझ्यासाठी सुरुवात आहे, असं देविशाने सोशल मीडियावर पोस्ट (Devisha Shetty Instagram Post) करत म्हटलं आहे.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - रोहित शर्मा (C), शुभमन गिल (VC), विराट कोहली, केएल राहुल (WK), ऋषभ पंत (WK), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.