Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादवने (surykumar yadav) क्रिकेट वर्तुळात धुमाकूळ घालून ठेवला आहे. त्याची प्रत्येक खेळी पाहून संपुर्ण क्रिकेट विश्व अचंबित झाले आहे. क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू देखील त्याच्या खेळीच कौतूक करतायत. या सर्वांत मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंना सूर्याला रोखायचे कसे हा प्रश्न पडलाय? कारण पुढे प्लेयर लावला की मागे मारतो आणि मागे लावला की पुढे मारतो. त्यामुळे सुर्यासाठी नेमकी फिल्डींग लावायची तरी कशी? असा प्रश्न आता श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाला (Dasun Shanaka) पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हे ही वाचा :  सुर्याचा 'भीमपराक्रम'! शतकी खेळी करत 'हे' रेकॉर्ड ब्रेक


 


सूर्याचे वादळी शतक


टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली आहे. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या त्याच्या खेळीच क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय. 


फिल्डींग लावायची कशी?


मैदानावर सिक्स आणि फोरची आतिषबाजी करणाऱ्या सुर्यकुमार यादवसाठी  (surykumar yadav)नेमकी फिल्डींग लावायची कशी अशा प्रश्न कर्णधार दासून शनाकाला (Dasun Shanaka) पडला होता. कारण पुढे प्लेयर लावला की मागे मारतो आणि मागे लावला की पुढे मारतो. त्यामुळे सुर्यासाठी  (surykumar yadav) नेमकी फिल्डींग लावायची तरी कशी? असा मोठा प्रश्न आता प्रत्येक प्रतिस्पर्धी खेळाडूंना पडला आहे. 



टी20 फॉरमॅटमध्ये तिसरे शतक


सूर्यकूमारने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्ध (Sri lanka) 112 धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. हे त्याचे टी20 फॉरमॅटमधले तीसरे टी20 शतक (Third Century) होते. या आधी त्याने जूलै 2022 मध्ये (England) इंग्लंडविरूद्ध 117 धावा केल्या होत्या. हे त्याचे टी20तले पहिले शतक होते. तर दुसरे शतक त्याने न्यूझीलंड (New  zealand) विरूद्ध नोव्हेंबरमध्ये ठोकले आहेत. यावेळी त्याने 111 धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळी दरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूंना हाच प्रश्न पडला होता.


दरम्यान 2023 या नवीन वर्षात सूर्यकुमारने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्ध पहिले टी20 शतक ठोकले आहे. आगामी सामन्यात त्याच्या बॅटीतून आणखी शतके पाहण्याचा योग येणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सदेखील उत्सुक आहेत.