कुस्तीपटू सुशील कुमारला सुवर्णपदक
सुशील कुमार या भारतीय कुस्तीपटूची `कम्पेटेटीव्ह रेसलिंग`मध्ये पुनरागमन झालं आहे. सुशीलचे हे पुनरागमन `गोल्डन` कमाई ठरली आहे. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुशील कुमारने मान उंचावली आहे.
जोहान्सबर्ग : सुशील कुमार या भारतीय कुस्तीपटूची 'कम्पेटेटीव्ह रेसलिंग'मध्ये पुनरागमन झालं आहे. सुशीलचे हे पुनरागमन 'गोल्डन' कमाई ठरली आहे. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुशील कुमारने मान उंचावली आहे.
गोल्डन कामगिरी -
कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये 74 वजनी फ्री स्टाईल गटात सुशील कुमारने सुवर्णपदक कमावले आहे.
८-० अशी दमदार कामगिरी करत सुशीलने हे सुवर्णपदक कमावले आहे.
ट्विटरवर व्यक्त केल्या भावना
सुमारे तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धेत उतरल्यानंतर सुवर्णपदक कमावणं ही भावना अभिमानास्पद असल्याचे सुशीलने ट्विटर हॅन्डलवर लिहले आहे. तसेच सुशीलने हे सुवर्णपदक त्याच्या गुरूंना अर्पण केले आहे.