मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यापासून, ट्विटरवर लोक अधिक एक्टिव्ह झाले आहेत. ट्विटरवर लोकांनी इलॉन मस्क यांना इतर कंपन्या खरेदी करण्याचं आवाहन करण्यास सुरुवात केलीये. अशातच आता भारतीय टीमचा युवा फलंदाज शुभमन गिलनेही एलन मस्ककडे एक खास मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलने रात्री 11 वाजून 1 मिनिटांनी ट्विट केलं. यामध्ये त्याने एलन मस्क यांना ट्विट करून टॅगही केलंय. गिलने ट्विट केलं आणि लिहिलं, "एलन मस्क, कृपया स्विगी खरेदी करा जेणेकरून ते वेळेवर डिलीव्हरी देतील."


दरम्यान शुभमन गिलचं हे ट्विट भलेही एलन मस्कने वाचलं नसेल पण हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. यावर स्विगी नावाच्या एका ट्विटर हँडलने रिप्लाय देत गिलला भन्नाट उत्तर दिलं आहे. स्विगी नावाच्या या हँडलवरून ट्विट करण्यात आलंय की, तुझ्या टी20 क्रिकेटमधील बॅटींगपेक्षाही डिलीव्हरी फास्ट आहे.



दरम्यान रिप्लाय देणारं हे अकाऊंट स्विगीचं अधिकृत ट्विटर हँडल नाही. मात्र स्विगी नावाच्या या ट्विटनंतर शुभमन गिलला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. 



दुसरीकडे स्विगीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गिलला उत्तर देण्यात आलं की, "हाय शुभमन, Twitter or no Twitter, आम्हाला फक्त तुमच्या ऑर्डरनुसार सर्वकाही परिपूर्ण हवं आहे (जर तुम्ही ऑर्डर दिली असेल). तुमच्या डिटेल्स थेट मेसेजकरून आमच्याशी संपर्क साधा."