SMAT Final 2021 | थरारक सामन्यात Sharukh Khan चा कारनामा, शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत तामिळनाडू चॅम्पियन
शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकावर (Tamil Nadu vs Karnataka) 4 विकेट्सने मात केली आहे.
नवी दिल्ली : सय्यद मुश्ताक अली स्पर्धा 2021 च्या विजेतेपदावर (Syed Mushtaq Ali Trophy 2021) तामिळनाडूने कब्जा केला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकावर (Tamil Nadu vs Karnataka) 4 विकेट्सने मात केली आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) तामिळनाडूच्या विजयाचा हिरो ठरला आहे. तामिळनाडूला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज होती. शाहरुखने या अंतिम चेंडूवर खणखणीत सिक्स मारत तामिळनाडूला विजय मिळवून दिला. (Syed Mushtaq Ali Trophy 2021 final Shahrukh Khan wins the game for Tamil Nadu with a last ball 6 in the Final against Karnataka Arun Jaitley Stadium Delhi)
शाहरुखचा खानचा खणखणीत सिक्स
कर्नाटकाने तामिळनाडूला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान तामिळनाडूने 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तामिळनाडूकडून एन जगदीशनने सर्वाधिक 41 धावांची खेळी. मात्र शाहरुखने निर्णायक क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे तो विजयाचा हिरो ठरला.
शाहरुख खान तामिळनाडूच्या विजयाचा 'बाजीगर'
शाहरुख खान सहाव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला. त्याने निर्णायक क्षणी 15 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. या वादळी खेळीत त्याने 3 सिक्स आणि 1 चौकार लगावला. शाहरुखने दबावात्मत स्थितीत चौफेर फटकेबाजी केली, त्यासाठी त्याचं कौतुक होतंय. शाहरुखसह साई किशोरनेही तामिळनाडूच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. साईने शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला.
शाहरुख आणि साई किशोर व्यतिरिक्त तामिळनाडूकडून सलामीवीर हरी निशांथने 23 तर कर्णधार विजय शंकरने 18 धावा केल्या. कर्नाटकाकडून केसी करीअप्पाने 2 विकेट्स घेतल्या. तर विद्याधर पाटील, करुण नायर आणि प्रतिक जैन या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
कर्नाटकाची बॅटिंग
दरम्यान त्याआधी तामिळनाडूने कर्नाटकाला बॅटिंगसाठी भाग पाडले. कर्नाटकने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 151 धावा केल्या.
कर्नाटकाकडून अभिनव मनोहरने सर्वाधिक 46 धावा केल्या. प्रवीण दुबेने 33 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणालाही 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाही.
बॅटिंगने कमाल करणाऱ्या साई किशोरने तामिळनाडूकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने 4 ओव्हरमध्ये 3 च्या इकॉनॉमीने अवघ्या 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.