क्रिकेटच्या मैदानात राडा! प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांमध्ये भिडले, पाहा VIDEO
असं काय झालं की क्रिकेटच्या मैदानात दोन खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले, VIDEO पाहिलात का तुम्ही?
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात स्लेजिंगच्या (Sledging) अनेक घटना घडत असतात. यामध्ये काही घटना निवळतात, तर काही घटनांमध्ये मोठा वाद निर्माण होता. आता अशीच क्रिकेटच्या मैदानातील (Cricket Ground) वादाची घटना समोर आली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत दोन खेळाडू भिडल्याची घटना समोर आली आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय हे जाणून घेऊयात.
प्रसिद्ध क्रिकेटर अंबाती रायडू (Ambati Rayudu) नेहमीच वादात सापडला आहे. मैदान असो अथवा मैदानाबाहेर तो नेहमीच वादामुळे चर्चेत आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा तो वादात सापडला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) सामन्यात तो प्रतिस्पर्धी खेळाडूशी भिडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
हे ही वाचा : Urvashi Rautela ने ऋषभ पंतसाठी ठेवला करवा चौथ?, म्हणते, 'आयुष्यभराची साथ...'
Urvashi Rautela ने ऋषभ पंतसाठी ठेवला करवा चौथ?, म्हणते, 'आयुष्यभराची साथ...'
प्रकरण काय?
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा (Syed Mushtaq Ali Trophy) एलिट ग्रुप डी सामना सौराष्ट्र (Saurashtra) आणि बडोदा (Baroda) यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात स्ट्राईकवर असलेला शेल्डन जॅक्सनला (Sheldon Jackson) बॉल खेळण्यास उशीर करत होता. त्यामुळे मैदानावर फिल्डींग करत असलेल्या रायडूने (Ambati Rayudu) जॅक्सनला फटकारले आणि स्लेजिंग केली.
जॅक्सनला (Sheldon Jackson) ही स्लेजिंग अजिबात आवडली नाही आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. जॅक्सन हातात बॅट घेऊन रागाने रायडूच्या दिशेने जाऊ लागला. तर दुसरीकडे रायडूही (Ambati Rayudu) जॅक्सनकडे रागारागात निघाला. दोघांमध्ये हाणामारी होणार हे लक्षात घेताच अंपायर्स आणि बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवलं. 9 व्या ओव्हर्सदरम्यान ही घटना घडली होती. मैदानावरील या घटनेचा व्हिडिओ आता कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
वृद्ध व्यक्तीसोबत भांडण
अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) वादांचा मोठा इतिहास आहे. 2017 मध्ये त्याची रस्त्यातच एका वृद्ध व्यक्तीसोबत भांडण झाले होते. खरंतर रायडू वेगाने कार चालवत होता. त्यावर एका वृद्धाने त्याला अडवले, त्यानंतर रायुडू (Ambati Rayudu) हाणामारीत उतरला आणि त्याने त्या वृद्धाला थप्पडही मारली होती, अशी माहिती आहे.
हरभजन सिंहसोबत वाद
रायुडू 2016 च्या आयपीएलमध्ये हरभजन सिंहवर (Harbhajan Singh) देखील चिडला होता. रायडूने हरभजन सिंहच्या बॉलवर चुकीची फिल्डींग केली, ज्यावर हरभजन संतापला. तो रायुडूला रागाने काहीतरी म्हणाला, त्यानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दरम्यान यानंतर 2019 च्या विश्वचषकात रायुडूकडे (Ambati Rayudu) दुर्लक्ष झाले होते. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करून मोठा गदारोळ केला होता.
दरम्यान असे अनेक किस्से आहेत, ज्यामुळे अंबाती रायुडू (Ambati Rayudu) वादात सापडला आहे. आता पुन्हा एकदा मैदानात वाद घातल्याने तो चर्चेत आला आहे.