मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत (rishabh pant) यांच नाव एकमेकांशी नेहमीच जोडलं जात. या दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर सुरु असते. आता पुन्हा एकदा एक अशीच चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) ऋषभसाठी करवा चौथचा उपवास ठेवल्याचं बोललं जात आहेत. या चर्चेत आता किती तथ्य आहे हे जाणून घेऊयात.
पोस्टमध्ये काय?
उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये ती हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. फोटोत ती अगदी साध्या लूकमध्ये कपाळावर कुंकु लावून गळ्यात मंगळसूत्र घातलेली दिसतेय. एका नव्या नववधू सारखी ती नटलीय. त्यामुळे तिचा हा फोटो खूपच चर्चेत आला आहे. या फोटोसोबतच पोस्टमधील कॅप्शनही प्रचंड चर्चेत आले आहे.
हे ही वाचा : क्रिकेटच्या मैदानात राडा! प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांमध्ये भिडले, पाहा VIDEO
या फोटोच्या कॅप्शनला तिने एक कविता लिहली आहे, प्रेमात पडलेल्या प्रेयसीला कपाळावरच्या कुंकवापेक्षा प्रिय काहीही नाही !! सर्व विधी आणि विधीपूर्वक हवी आहे, आयुष्यभराची साथ तुझी!!, असे तिने लिहले आहे.
पोस्टमधला तिचा लुक आणि कॅप्शन पाहता, नेटकरी याचा थेट संबंध ऋषभ पंतशी (rishabh pant) जोडतायत. काही नेटकरी उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसाठी करवा चौथचा उपवास ठेवल्याचे बोलत आहेत. गळ्यात मंगळसुत्र आणि डोक्यावरचा कुंकू पाहून नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलाने करवा चौथचा उपवास करत असल्याचे कमेंट करायला सुरुवात केली. यासोबत कवितेतील ओळी या चर्चांना आणखीणच बळ देत आहेत.
कवितेत उर्वशीने (Urvashi Rautela) स्वत:ला प्रेयसी म्हटलं आहे, तसचे कंपाळावरती कुंकु तिला प्रिय आहे, तिला आयुष्यभराची साथ हवी आहे, असा संदेश जातोय. त्यामुळे नेटकऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजाला आणखीणच बळ मिळत आहे.
उर्वशीच्या (Urvashi Rautela) या पोस्टवर सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी उर्वशीला कमेंट सेक्शनमध्ये विचारले आहे की ती ऋषभ पंतसाठी (rishabh pant) करवा चौथचा उपवास करण्याची तयारी करत आहे का? मात्र हा फोटो पाहता अनेकांनी तिचा हा आगामी चित्रपटातला लुक असावा असाही अंदाज वर्तवला आहे.