T-20 WC: पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास भारत का नाकारु शकत नाही, जाणून घ्या कारण
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये (T-20 world cup 2021) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला जाणार आहे.
मुंबई : आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये (T-20 world cup 2021) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला जाणार आहे. बीसीसीआय (BCCI) 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपचं आयोजन करत आहे. 24 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान (India vs pakistan) सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना काँग्रेस नेते आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. (T-20 WC: why India can't refuse to play against Pakistan)
शुक्ला म्हणाले, "आम्ही जम्मू -काश्मीरमधील हत्यांचा तीव्र निषेध करतो. दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. भारत-पाकिस्तान सामना बाबत बोलायचं झालं तर आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेनुसार, तुम्ही कोणाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही. तुम्हाला आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये खेळावेच लागते.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांना, विशेषत: स्थानिकांना लक्ष्य केले जात आहे आणि मारले जात असल्याने बीसीसीआय आणि सरकारने आयसीसी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा पुनर्विचार करावा अशी चर्चा होती. शुक्ला म्हणाले की, दहशतवादी संघटनांविरोधात कडक कारवाई केली जावी, पण पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला जावा, कारण ती आयसीसीची स्पर्धा आहे.
आयसीसी विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज याशिवाय दोन क्वालिफायर संघ असतील. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड वगळता दोन क्वालिफायर संघ गट 2 मध्ये स्थान मिळवतील. भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध, 03 नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध. 5 नोव्हेंबरला आणि नंतर 8 नोव्हेंबरला भारताला दोन क्वालिफायर संघांसोबत खेळायचे आहे.