यूएई : इंग्लंड टीमचा स्टार सलामवीर जोस बटलरने (Jos Buttler) श्रीलंकेविरुद्धच्या (England vs Sri Lanka T 20 World Cup 2021) टी 20 वर्ल्ड कपमधील 29 व्या सामन्यात सिक्स ठोकत शानदार शतक पूर्ण केलं. बटलरने टी 20 कारकिकर्दीतील पहिलंवहिलं शतक हे सिक्स लगावत पूर्ण केलं. जोसने दुष्मंथा चमीराच्या गोलंदाजीवर हा सिक्स खेचला. जोसने 67 चेंडूत 6 सिक्स आणि तितक्याच चौकारांच्या मदतीने नाबाद 101 धावांची खेळी केली. जोसच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 163 धावा केल्या. टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये बटलर हा इंग्लंडकडून आणि एकूण शतक लगावणारा पहिलावहिला फलंदाज ठरला. तसेच अनेक रेकॉर्डब्रेकही त्याने केले आहेत. (t 20 world cup 2021 england vs sri lanka jos buttler complete his century with six makes many records) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकेटकीपर म्हणून टी 20 वर्ल्ड कपमध्ये कारनामा


बटलरची ही शतकी खेळी टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात दुसरी मोठी धावसंख्या ठरली. टी 20 वर्ल्ड कपमध्ये विकेटकीपर म्हणून ब्रँडन मॅक्युलमने सर्वाधिक 123 धावांची केळी केली आहे.  


टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे विकेटकीपर


ब्रँडन मॅक्युलम : 123


जोस बटलर : 101*


मोहम्मद रिझवान : 79*


कामरान अकमल  73


जोस बटलर : 71*


वेगवान 100 धावा करणारा सलामीवीर 


जोस नाबाद शतकी खेळीसह सलामीवीर म्हणून 1 हजार धावा पूर्ण केल्या. जोस इंग्लंडकडून वेगवान 1 हजार धावा करणारा फलंदाज ठरला. जोसने 26 डावात हा कारनामा करत एलेक्स हेल्सचा रेकॉर्डब्रेक केला.  


टी 20 मध्ये इंग्लंडकडून 1 हजार धावा करणारे फलंदाज


जोस बटलर : 26 डाव


एलेक्स हेल्स : 32 डाव


जेसन रॉय : 42 डाव


इंग्लंडकडून वेगवान 2 हजार धावा


जोस इंग्लंडकडून टी 20 क्रिकेटमध्ये वेगाने 2 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा फलंदाज ठरला. जोसने 78 डावांमध्ये हा कारनामा करत इयोन मॉर्गनचा रेकॉर्ड ब्रेक केला. मॉर्गनने 83 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. जोस टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून एलेक्स हेल्सनंतर शतक लगावणारा दुसरा बॅट्समन ठरला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये जोस ब्रँडन मॅक्युलमनंतर शतक लगावणारा दुसराच विकेटकीपर ठरला.