मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत (T 20 World cup 2021) 24 ऑक्टोबरला हायव्होलटेज महामुकाबला होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया (Team India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांमध्ये वातावरणनिर्मिती झाली आहे. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी या सामन्याबाबत भविष्यवाणी केली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने (Wasim Akram) बाबर आझम (Babar Azam) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्तवाची तुलना करत दोघांपैकी सर्वोत्तम कोण आहे, याबाबत विधान केलं आहे. (t 20 world cup 2021 former pakistan captain on team india captain virat kohli and pakistan captain babar azam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"विराट क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फलंदाज आहे, त्याचे आकडे दमदार आहेत. तसेच कर्णधार म्हणून त्याने उत्तमपणे नेतृत्व केलं आहे. बाबरबाबत बोलायचं झालं तर, तो आता कॅप्टन झालाय. तो आता शिकतोय. मात्र बाबर सातत्याने सर्व फॉर्मेटमध्ये धावा करतोय", असं अक्रम म्हणाला. तो आजतकच्या विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस तो बोलत होता.


विराट आणि बाबरच्या तुलनेबाबत काय म्हणाला?  


"कर्णधार म्हणून विराट आणि बाबरची तुलना करु शकत नाहीत. मात्र बाबर विराटच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय", असंही अक्रमने नमूद केलं.  


विराट आणि बाबर दोघे असे बॅट्समन्स आहेत, ज्यांच्या नावे अनेक विक्रम आहेत. विराट गेल्या दशकापासून सातत्याने धावा करतायेत. विराटचा प्रत्येक फॉर्मेटमधील एव्हरेज हा 50 पेक्षा अधिक आहे, तर 70 पेक्षा जास्त शतकं लगावली आहेत.


वसीम कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयावर काय म्हणाला?  


टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपदावरुन पायऊतार होणार असल्याचं जाहीर केलं. यावरही वसीमने प्रतिक्रिया दिली. विराटच्या या निर्णयामुळे मी हैराण होतो. मात्र विराट नेतृत्व सोडल्यानंतर तो आता आणखी आक्रमक होईल, असं अक्रम म्हणाला.


"कसोटी, वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात दबाव असतो. तसंच आयपीएलचाही प्रेशर असतो. अशा परिस्थितीत कॅप्टन्सी करणं सोपं नसतं. कदाचित म्हणूनच विराटने नेतृत्व सोडून दुसऱ्या कोणाला संधी देण्याचा विचार केला असावा. जेणेकरुन बॅटिंगवर अधिक लक्ष देता येईल", असंही अक्रमने सांगितलं.