यूएई : टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) 'रन'संग्रामाला आजपासून यूएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) सुरुवात होत आहे. या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अनेक टीम आमनेसामने भिडणार आहेत. या स्पर्धेपेक्षा सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या हायव्होलटेज सामन्याकडे लागून राहिलं आहे. दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धेमध्येच एकत्र खेळतात. त्यामुळे या सामन्याला आणखी महत्तव प्राप्त झालंय. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार या सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (t 20 world cup 2021 India captain Virat Kohli responds to Pakistan captain Babar Azam's statement to beat India)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीचं आझमला चोख प्रत्युत्तर


या सामन्याच्या तिकीटासाठी मोठी मागणी आहे. क्रिकेट चाहते दुप्पट तिप्पट पैसे मोजून तिकीट घेण्यासाठी तयार आहेत. यानंतरही विराटचं असं म्हणंन आहे की माझ्यासाठी हा सामना इतर सामन्यासारखाच आहे. तर दुसऱ्या बाजूला हा सामना आम्हीच जिंकणार, असा विश्वास बाबरने व्यक्त केला आहे. तर यावर मी असे दावे करण्यात विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया विराटने दिली. टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं आहे.


विराट काय म्हणाला?


टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यबाबत काही वेगळं वाटतं का, असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना विराट म्हणाला की, "मला असं कधी जाणवलं नाही. या सामन्याच्या तिकीटीसाठीची मागणी आणि विक्री जोरात सुरु आहे. माझ्याकडे अनेक मित्र हे तिकीट मागत आहेत. मात्र मला त्यांना नकार द्यावा लागतोय". 


"आमच्यासाठी सर्वसाधारण मॅच" 


"हा सामना आमच्यासाठी अन्य सामन्यांसारखाच आहे. हा सामना खिलाडूवृत्तीने खेळायला हवा आणि आम्ही तसंच खेळू. क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टीने हा सामना वेगळा असेल. मात्र खेळाडूंसाठी हा सामनाच असतो", असं विराटने म्हंटलं.