मुंबई  : टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेला (T 20 World Cup) झोकात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सध्या ग्रृप स्टेजमधील सामने सुरु आहेत. मात्र सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे टीम इंडिया (Team Indian) विरुद्ध पाकिस्तान (Pakista n  ) या हायव्होलटेज सामन्याकडे लागून राहिलंय. हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याआधीच सर्वत्र वातावरणनिर्मिती झाली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने (Inzamam Ul Haq) हा वर्ल्ड कप कोण जिंकणार याबाबत वक्तव्य केलं आहे. (T 20 World Cup 2021 india or Pakistan who will win the World Cup trophy pakistan former captain inzamam ul haq says)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही संघ 24 ऑक्टोबरला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या हायव्होलटेज सामन्याआधी इंझमामने मोठं विधान केलंय. टीम इंडियाच्या हा वर्ल्ड कप जिंकण्याची अधिक संधी आहे. इंझमाम त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता. यावेळस त्याने याबाबत वक्तव्य केलं.


इंझमाम काय म्हणाला?


"कोणती ही मोठी स्पर्धा कोणती टीम जिंकेल, हे सांगता येत नाही. मात्र कोणत्या संघाची स्पर्धेचं विजेतेपद जिंकण्याची शक्यता जास्त हे पाहिलं जातं. इतर संघाच्या तुलनेत विशेष म्हणजे या वातावरणात टीम इंडियाची वर्ल्ड कप जिंकण्याची शक्यता अधिक आहे", असं इंझमामने नमूद केलं.


"टीम इंडियाकडे टी 20 स्पेशालिस्ट आणि अनुभवी खेळाडू आहेत. विराटसेनेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या सराव सामन्यात सहजपणे विजय मिळवला. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर टीम इंडिया घातक संघ आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 150 पेक्षा अधिक धावांचा सहजपणे पाठलाग केला. यासाठी त्यांना विराट कोहलीची ही आवश्यकता भासली नाही",असं इंझमामने सांगितलं.


टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याबाबत काय म्हणाला?


"टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातली मॅच  म्हणजे फायनलच्या आधीची फायनल. या सामन्यासारखी हाईप इतर कोणत्याही सामन्याला नसते", अशा शब्दात इंझमामने या सामन्यांचं महत्तव स्पष्ट केलं.


चॅम्पियन टॉर्फीचं 2017 मध्ये आयोजन करण्यात आलं होतं. आयसीसीच्या या स्पर्धेतही टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध पहिला सामना खेळून मोहिमेला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेतील अंतिम फेरीतही दोन्ही संघ पोहचले होते. हे दोन्ही सामने फायनलसारखेच होते. जो संघ हा सामना जिंकेल, त्या टीमचा विश्वास वाढेल", असंही इंझमामने स्पष्ट केलं.