यूएई : टीम इंडियाचा (Team India) टी 20 क्रिकेटमध्ये (T 20 Cricket) पुढील कर्णधार कोण असणार, या प्रश्नाचं उत्तर स्वत: विराट कोहलीने (Virat Kohli) अखेरच्या सामन्यात दिलं आहे. विराटने नामबिया विरुद्धच्या सामन्याआधी याबाबतची हिंट दिली आहे. तसेच पुढील कर्णधाराचं नाव इशाऱ्याने सांगितंल आहे. (T 20 world Cup 2021 India vs Namibia 42nd Match Captain virat kohli give hint about next t 20 captain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट नाणेफेक जिंकल्यानंतर  म्हणाला, "टीम इंडियाचं नेतृत्व करणं ही सम्मानाची बाब आहे. तसेच मी सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचं प्रयत्न केला आहे. पण आता दुसऱ्यांना संधी देण्याची आणि पुढे जाण्याची वेळ आली आहे." रोहित शर्माकडे जबाबदारी असेल, हे स्पष्ट आहे", असं विराटने नमूद केलं. 
 
"संघाने ज्या प्रकारे कामगिरी केलीय, त्याचा मला गर्व आहे. आता मला वाटतं की कर्णधार म्हणून टीम इंडियाला पुढे घेऊन जाण्यासाठी दुसऱ्याला जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा उप कर्णधार आहे. त्यामुळे नियमांनुसार विराटनंतर कर्णधारपदासाठी रोहितच प्रबळ दावेदार आहे. रोहितला न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाला नवा कर्णधार मिळेल. तसेच या  मालिकेसाठी टीम इंडियाची आणि कर्णधाराची घोषणा होऊ शकते.
 
विराटने कर्णधार म्हणून शेवटच्या सामन्यात टॉस जिंकला. यानंतर विराट कोहलीचं दु:ख समोर आलं. "या स्पर्धेत टॉसने निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या दोन सामन्यात टॉस जिंकायला हवा होता", असंही विराटने स्पष्ट केलं. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.


विराटसह  मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच कार्यकाळ संपला आहे. शास्त्री गुरुजींनी त्यांच्या योगदानासाठी समाधान व्यक्त केलं. "तसेच टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या शानदार कामगिरीसाठी टीम इंडियाचं कौतुक केलं.