यूएई : न्यूझीलंडने टीम इंडियावर (Team India) टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2021) सामन्यात 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत पहिला विजय साजरा केला. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियावर चौफेर टीका केली जात आहे. या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. सलग दोन पराभवानंतरही टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचू शकते का, कसं असेल जर तरचं समीकरण, हे आपण जाणून घेणार आहोत. (t 20 World Cup 2021 team india semi final Qualification Scenarios know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला या सुपर 12 मध्ये आणखी 3 सामने खेळायचे आहेत. यामध्ये टीम इंडियाचा सामना हा अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामीबिया विुरुद्ध होणार आहे. टीम इंडियाने हे तिन्ही सामने जिंकल्यास खात्यात 6 पॉइंट्स होतील. 


तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामीबियावर विजय मिळवला, तर 8 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहचेल. हे जर तरचं समीकरण तरच होईल, जेव्हा टीम इंडिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ त्यांच्या उर्वरित 3 सामने जिंकतील.


मात्र अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामीबिया या तिन्ही संघांनी उलटफेर केला, तरीही त्याचा फायदाही न्यूझीलंडलाच होणार. कारण न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत करत 2 पॉइंट्सची कमाई केली आहे.  जर न्यूझीलंड अफगाणिस्तानकडून पराभूत झाला आणि नामीबिया आणि स्कॉटलँडचा पराभव केला, तर किवींचे 6 पॉइंट्स होतील. त्यामुळे नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंड टीम इंडियाच्या पुढे राहिल. 


टीम इंडियाला उर्वरित सामने जिंकणं बंधनकारक 


टीम इंडियाला उर्वरित सामने जिंकणं बंधनकारक असणार आहे. विषय इतक्यावरच संपत नाही. टीम इंडियाचं  भवितव्य हे इतर संघाच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामीबियाचं आव्हान आहे. 


टीम इंडियाने या तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर 6 पॉइंट्स होतील. मात्र पहिले 2 सामने मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने नेट रनरेट कमीच असणार आहे. त्याचा फायदा हा अन्य संघांना होणार. या नेटरन रेटच्याबाबतीत न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान टीम इंडियापेक्षा पुढे राहू शकतात.


नेट रनरेट (NRR)


टीम इंडियाला सेमीफायनल फेरी गाठण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणं महत्त्वाचं असणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया उर्वरित सामन्यात कशी कामगिरी करतं, याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.