IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड भिडणार, पाकिस्तान विरुद्ध कोण खेळणार?
India vs England Semi-Final: आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) टीम इंडिया आणि इंग्लंडची (IND vs Eng) धमाकेदार कामगिरी राहिली आहे.
India vs England Semi Final : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील (Icc T 20 World Cup 2022) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये (2nd Semi Final) गुरुवारी टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND Vs Eng) आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध भिडेल. आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची धमाकेदार कामगिरी राहिली आहे. दरम्यान या सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल की फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम कोण असेल. (t 20 world cup 2022 ind vs eng 2nd semifinal head to head records)
आकडेवारी कुणाच्या बाजूने? (IND vs ENG head to head records)
टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत टीम इंडिया-इंग्लंड एकूण 22 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडिया वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने एकूण 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर इंग्लंडने भारताला 10 वेळा पराभूत केलंय. तसेच हे दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये अनुक्रमे 2007, 09 आणि 12 साली एकण 3 वेळा एकमेकांसमोर आले. भारताने या 3 सामन्यांपैकी 2 वेळा इंग्लंडचा पराभव केला. तर इंग्लंडला एकदाच विजय मिळवता आला.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंग्लंड
जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, जोनाथन बेयरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, फिल साल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेविड विली, क्रिस वोक्स आणि मार्क वूड.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह.