मुंबई : टीम इंडिया (Indian Cricket Team) वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cuo 2022) पाकिस्तानवर (IND vs PAK) शेवटच्या बॉलवर थरारक विजय मिळवला. यासह टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृतवात वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली. विजयामुळे टीम इंडिया आणि चाहते फारच आनंदी होते. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या गोटात नाराजीचं वातावरण होतं. सामन्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार असल्याचं दिग्गज क्रिकेटरने  म्हटलंय. या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारत-पाक यांच्यात सामना रंगेल, असा दावा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केलाय. (t 20 world cup 2022 ind vs pak team india and pakistan play again says paksitan foremer bowler shoaib akhatar)


अख्तर काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"टीम इंडियाने एक सामना जिंकलाय तर पाकिस्तानने एक सामना गमावलाय. या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाक यांच्यात पुन्हा एकदा सामना होईल. जेव्हा टीम इंडिया-पाकिस्तान हे खेळतात तेव्हा वर्ल्ड कपचा श्रीगणेशा होतो. हा सामना इतिहासातील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक होता", असं शोएबने आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्पष्ट केलं.  


"मेलबर्नमधील खेळपट्टी फार खराब होती. मात्र यानंतरही पाकिस्तानने 160 धावा केल्या. पाकिस्तानची लोअर मिडल ऑर्डर जबाबदारीने खेळलं नाही. पाकिस्तानला आणखी धावा करता आल्या असत्या. पाकिस्तानला हा पराभव स्वीकारून आगामी सामन्यांची तयारी करायला हवी", असा सल्लाही शोएबने आपल्या टीमला दिला.


दरम्यान टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचा वर्ल्ड कपमधील पुढील सामना 27 तारखेला होणार आहे. नेदरलँडसमोर टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. तर पाकिस्तान विरुद्ध झिंबाब्वे अशी रंगत  लढणार आहे.