मुंबई : T20 वर्ल्ड कप 2022 ची (T20 World Cup 2022) सुरुवात झालीय. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यावर तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा  खिळल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियाचा (Team India) प्लॅन सांगितला आहे. बीसीसीआयने (Bcci) हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  (t 20 world cup 2022 team india captain rohit sharma prepared plan against pakistan match)


रोहित काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“खेळाडूंनी सामन्यादरम्यान स्वत:ला शांत आणि संयमी ठेवता आले तर आम्हाला हवे तसे निकाल मिळतील. वर्ल्ड कप जिंकून बरेच दिवस झाले आहेत", असं रोहित म्हणाला.  तसेच त्याने पाकिस्तान विरुद्धचा प्लॅनही सांगिततलाय.  टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला भिडणार आहे.



“सुरुवातीला ही एक मोठी मॅच आहे. पण आम्ही ‘रिलॅक्स’ राहू आणि खेळाडू म्हणून काय करायला हवे यावर लक्ष केंद्रित करू. हे आमच्यासाठी महत्त्वाचे असेल", असंही रोहितने नमूद केलं.