यूएई : टीम इंडियाची टी  20 वर्ल्ड कपमधील सुरुवात निराशाजनक राहिली. पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा  लागला. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव करुन पहिलावहिला विजय साजरा केला.  टीम इंडियाच्या या विजयात केएल राहुल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. रोहिकने 74 तर राहुलने 69 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी 140 धावांची सलामी भागीदारी केली. यासह या सलामी जोडीने 14 वर्षांपूर्वीचा टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीचा रेकॉर्ड ब्रेक केला.  (T 20I World Cup India vs Afghanistan k l rahul and rohit sharma makes highest recordbrake partneship for india in t 20 world cup) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे विक्रम?  


रोहित आणि राहुलने टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी 140 धावांची सलामी भागीदारी केली. टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वात मोठी विक्रमी भागीदारी ठरली. या दोघांनी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग या जोडीने केलेला रेकॉर्ड ब्रेक केला. सेहवाग-गंभीरने 2007 च्या पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 136 रन्सची पार्टनरशीप केली होती.


टीम इंडियाचं जर तरचं आव्हान कायम


दरम्यान अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवल्याने टीम इंडियाच्या सेमी फायनलच्या जर तरच्या आशा कायम आहेत. टीम इंडियाच्या आता 2 सामने उर्वरित आहेत. विराटसेनेला या दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवायचा आहे. सोबतच ग्रृप बी मधील इतर सामन्यांच्या निकालावरही टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया नेट रनरेटच्या जोरावर सेमी फायनलमध्ये पोहचणार की लीग स्टेजमध्ये गाशा गुंडाळावा लागणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.