मुंबई : टी-20 मुंबई लीग लांबणीवर गेली आहे. लीगचे चेअरमन मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी ट्वीटरवरुन ही माहिती दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळाडू आणि फ्रांचाईजीतील कर्मचारी वर्ग यांच्या सुरक्षेसाठी निर्णय घेण्यात आल्याचे मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले. टी-20 मुंबई लीगसाठी BCCI ने परवानगी दिली होती. मात्र वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर मुंबई क्रिकेट संघटनेकडून स्पर्धा पुढे ढकलण्यात आलीय. 



टी 20 वर्ल्डकपवरही कोरोनाचं सावट 


देशभरात कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. त्याच दरम्यान कोरोनाचं महासंकट IPLवरही आहे. मात्र संपूर्ण काळजी घेऊन IPL सुरू आहे. IPL नंतर टीम इंडियाचा इंग्लंड दौरा आणि त्यानंतर भारतात टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारा टी 20 वर्ल्ड कप देखील कोरोनाच्या सावटाखाली आहे. एकावेळी दोन शहरांमध्ये सामने होणार आहेत. त्यानुसार बायो बबलचं नियोजन केलं जाईल. एकाचवेळी 9 किंवा 4 ठिकाणी सामने होणार नाही. तर IPLमध्ये एका दिवशी एक किंवा दोन सामने दोन शहरांमध्ये खेळवले जातात तसंच नियोजन वर्ल्ड कपसाठी करण्यात येईल असे संकेत देण्यात आले आहेत. 


भारतात एकूण 9 शहरांमध्ये सामने होणार आहे. तर महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, लखनऊ आणि धर्मशाला (हिमाचल) अशा नऊ ठिकाणी सामन्यांचं आयोजन करण्यात येईल. तर महाअंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान याच्या तारखा असणार आहेत.