T20 World Cup 2022 BCCI President Roger Binny: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून मोठे उलटफेर पाहायला मिळाला. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेला वेस्ट इंडिज संघ बाहेर गेला. त्यानंतर सुपर 12 फेरीतही आश्चर्यकारक सामने झाले. झिम्बाब्वेनं दिग्गज पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे टी 20 वर्ल्डकपमध्ये निवडक संघाचं वर्चस्व आहे, असं म्हणता येणार नाही. आता बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं पराभूत केल्यानंतर टीम इंडियाची (Team India) कानउघडणी केली आहे. तसेच दुबळ्या गणल्या जाणाऱ्या संघापासून सावध राहण्यास सांगितलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉजर बिन्नीनं एएनआयशी बोलताना सांगितलं की, "नवखे संघ पुढे येत आहेत हे चांगले आहे. झिम्बाब्वे आणि आयर्लंडने या T20 विश्वचषकात हे सिद्ध केले आहे. आता तुम्ही छोट्या संघांना हलक्यात घेऊ शकत नाही. ज्युनियर संघ तुम्हाला सहज पराभूत करू शकतात. त्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. क्रिकेट हा एक मजेदार खेळ आहे. तुम्हाला माहीत नाही, यात कधीही काहीही होऊ शकते"


T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेनं पराभूत केल्यानंतर हरभजन सिंग भडकला, म्हणाला; "या दोघांना टीमबाहेर करा"


सुपर 12 फेरीतील गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका संघ 5 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघ 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. पण असं असलं तरी बांगलादेशचे देखील 4 गुण आहेत. त्याचबरोबर झिम्बाब्वे 3 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. आता भारताचा सामना बांगलादेश आणि झिम्बाब्वे सोबत आहे. त्यामुळे यापैकी एक पराभव महागात पडू शकतो.