T20 WC 2022 India Vs Pakistan: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान (India Vs Pakistan) सामन्याचे वेध लागले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या संघांमधील सामना कायमच हायव्होल्टेज राहिला आहे. सामन्यापूर्वीच दोन संघाचे चाहते सोशल मीडियावर (Social Media) एकमेकांना भिडले आहेत. वर्ल्डकपमध्ये सातत्यानं हरण्याचं दृष्टचक्र मागच्या टी20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानच्या बाबरसेनेनं तोडलं. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला सामना होणार आहे. त्यामुळे मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय संघाकडे असल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहेत. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघातून तीन खेळाडूंना वगळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात तीन फिरकीपटू आहे. त्याच युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांची निवड करण्यात आली आहे. तर दीपक हुड्डा पार्ट टाईम बॉलर आहे. यापैकी दोन जणांची प्लेईंग 11 मध्ये निवड होईल. युजवेंद्र चहल चांगलाच फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या टी 20 मालिकेत अक्षर पटेलनं 8 बळी घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना स्थान मिळेल. तर आर. अश्विनला आराम देण्याची शक्यता आहे.


भारतीय संघात ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन यष्टिरक्षकांचा समावेश आहे. आशिया चषक 2022 सुपर 4 फेरीत ऋषभ पंतने दिनेश कार्तिकच्या जागेवर संघात स्थान मिळवलं होतं. ऋषभ पंत हा भारताच्या फलंदाजी क्रमातील एकमेव डावखुरा आहे आणि त्याच्याकडे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची गुणवत्ता आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी दिनेश कार्तिकला विश्रांती दिली जाऊ शकते.


Asia Cup 2022 Womens: अंतिम फेरीत भारत 'या' संघाशी भिडणार, पाकिस्तानचा 'मौका' शेवटच्या चेंडूवर हुकला


जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर असेल. भुवनेश्वर कुमार दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतो. त्यामुळे सलामीच्या फलंदाजांना अडचण निर्माण होऊ शकते. टी 20 फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. मात्र, त्याची डेथ बॉलिंग ही चिंतेची बाब आहे, त्यामुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.


पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11


  1. रोहित शर्मा

  2. केएल राहुल

  3. विराट कोहली

  4. सुर्यकुमार यादव

  5. हार्दिक पांड्या

  6. ऋषभ पंत

  7. अक्षर पटेल

  8. युजवेंद्र चहल

  9. मोहम्मद शमी

  10. अर्शदीप सिंग

  11. हर्षल पटेल