मुंबई : 2021च्या T20 वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात केन विलियम्सनच्या न्यूझीलंड संघाने विराट ब्रिगेडचा आठ विकेट्स राखून पराभव केला. सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठणं कठीण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय फॅन्स प्रचंड संतापले आहेत. आता ट्विटरवर इंडियन प्रीमियर लीगवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. ज्यासाठी #BanIPL हा हॅशटॅग वापरण्यात येतोय. जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकत नाही, तेव्हा एवढी महागडी लीग आयोजित करून काय उपयोग, असं फॅन्सचं म्हणणं आहे.


याशिवाय मेंटॉर धोनीच्या भूमिकेवरही फॅन्स प्रश्न उपस्थित करत आहेत. यासाठी MentorDhoni हा हॅशटॅग वापरण्यात येतोय. विशेष म्हणजे या T-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) MSची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007मध्ये पहिला T-20 विश्वचषक जिंकला होता.


भारत पाचव्या नंबरवर


या विजयासह न्यूझीलंड ग्रुप-2 च्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तान या गटात पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत तीन सामन्यांत 6 गुण जमा केले आहेत. 3 सामन्यात दोन विजयांसह अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. नामिबिया चौथ्या, भारत पाचव्या आणि स्कॉटलंडचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.